🌟पुर्णेतील स्वप्नपूर्ती गणेश मंडळाकडून आनंद नगर येथे पहिल्यांदाच गौरी (महालक्ष्मी) सजावट स्पर्धेचे आयोजन...!


🌟सण आनंदाचा आनंदात आपल्या आनंद नगरात साजरा करू माता भगिनींचा आनंद द्विगुणित करू🌟


पुर्णा (दि.२२ सप्टेंबर २०२३) - आपले श्री गणेश महोत्सव तसेच सण गौरी गणपती हे सन आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.दैनंदिन जीवनात आनंद आणि ऊर्जा देण्याचे काम सणाच्या माध्यमातून होत असते.बुध्दीची देवता श्री गणेश आणि आदिशक्तीचे घरी होणारे आगमन हा अगदी आनंदाचा सोहळा असतो

घरी विराजमान होणाऱ्या आपल्या गणपती बाप्पा आणि गौरीची ( महालक्ष्मी ) सजावट ही आपण खूप छान पद्धतीने करत असतो.सामाजिक संदेश देत ही सजावट होत असते.याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कल्पतरु,स्वप्नपूर्ती गणेश मंडळच्या माध्यमातून गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहोत.या स्पर्धेत माता भगिनींनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन स्वप्नपूर्ती गणेश मंडळांच्या वतीने आयोजक कारण साहेबराव कल्याणकर यांनी केले आहे......

☀️प्रथम पारितोषिक

साहेबराव कल्याणकर (दाजी) 

3100 रु पैठणी व सन्मान चिन्ह


☀️द्वितीय पारितोषिक

गंगाधर महामुने 

2100 रु पैठणी व सन्मान चिन्ह


☀️तृतीय पारितोषिक

अमोल रामराव काळे 

1100 रु पैठणी व सन्मान चिन्ह 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या