🌟परभणी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी रविवारी लेखी परीक्षा : उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित....!


🌟परभणी एनआयसीच्या संकेतस्थळावरही प्रवेशपत्र उपलब्ध : परभणी जिल्ह्यात 186 पदांसाठी 8 हजार 834 अर्ज🌟

परभणी (दि.२० सप्टेंबर २०२३) : परभणी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी रविवार (दि.२४)रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान परभणी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आले असून, अद्यापही ज्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही, त्यांनी परभणी एनआयसीच्या संकेतस्थळावर जावून ते डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात कोतवाल पदाच्या १८६ जागा भरावयाच्या असून, त्यासाठी ८ हजार ८३४ उमेदवारांचे अर्ज लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. परभणी तालुक्यात २७ जागांसाठी सर्वाधिक १९७५ अर्ज पात्र ठरले असून, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३० जागांसाठी तुलनेने कमी (१६१०) अर्ज पात्र झाले आहेत. पूर्णा २१ पदांसाठी १०९३, पालम १४ जागांसाठी ६९९, गंगाखेड १८ जागांसाठी ७८५, सोनपेठ १६ जागांसाठी ४७७, पाथरी १५ जागांसाठी ५६९, मानवत १८ जागांसाठी ६२० आणि सेलू तालुक्यात कोतवालाच्या २७ जागा भरण्यासाठी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी १००६ उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरले आहेत.

त्यांची रविवारी होणा-या परीक्षेचे प्रवेशपत्र टपाल कार्यालयामार्फत रजिस्टर पोस्टाने निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र ज्या उमेदवारांना कोतवाल पदभरतीचे प्रवेशपत्र अद्यापही प्राप्त झाले नाही त्यांनी Parbhani.nic.in या संकेतस्थळावर जावून https://parbhani.techcohort.com/ येथून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या