🌟नांदेड न्यायालयाने दिपक रांगाला सुनावली २१ सप्टेबर पर्यन्त पोलिस कोठडी🌟
नांदेड : नांदेड येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या कांडातील शार्प शूटर दिपक रांगा याला नांदेड पोलिसांनी रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी नेपाळ बॉर्डर वरून ताब्यात घेतले असल्याचे समजते त्याला काल सोमवार दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी नांदेड न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ सप्टेबर २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बांधकाम व्यवसायिक संजय बियानी हत्या कांडात या अगोदर नांदेड पोलिसांना १७ जणांना अटक केली होती. ५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान संजय बियाणी यांची त्यांच्या शारदानगरस्थित घराजवळ दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात दहशतवादी हरविंदरसिंह उर्फ रिंदा हा मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन झाले होते.
घटनेच्या दिवशी दीपक रांगा व त्याच्या साथीदारांने पाळत ठेवून संजय बियाणी यांची हत्या केली होती. घटनेनंतर दोघेही फरार झाले. यातील दिपकला एनआयएने आठ महिन्यांपूर्वी नेपाळ सीमेवर अटक केली होती. रविवारी चंदीगड कारागृहातून त्याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेवून नांदेडला आणले. सोमवारी त्याला न्यायालयाने १२ दिवसांची म्हणजेच २१ सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
0 टिप्पण्या