🌟विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन🌟
नांदेड (दि.२६ सप्टेंबर २०२३) - नांदेड येथील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी १००% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सतत च्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग-४७१ cumec (१६६३२.०० cusec) १२.०० am वाजता उघडण्यात आलं आहे.
तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी असे आवाहन पूर नियंत्रण अधिकारी शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन नांदेड यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या