🌟मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा जिवंत करणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?

 


🌟आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे त्यांची भाषनही चांगलीच गाजली🌟

✍🏻लेखक : अविनाश देशमुख शेवगाव 

9960951755

जालना जिल्हयातील अंबड  तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराटी या गावात मागच्या ४ दिवसांपासून अमरण उपोषण सुरू होतं. हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात चालत होतं. आंदोलनाला बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती खराब होत असल्या कारणाने त्यांना पोलिसांनी उपोषणावरून उठण्याची आणि हॉस्पीटल मध्ये भरतीहोण्याची विनंती केली.पण ते त्यांच्या भुमिकेवरठाम होते.


पोलिस आणि जरांगे पाटील यांच्यात काही काळ चर्चा झाली. पण, त्यानंतर पोलिस व आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यात चांगलाच राडा झाला. पोलिसांच म्हणण होतं की आंदोलकांनी पहिले दगडफेक केली. तर, आंदोलकांच म्हणण होत पोलिसांनी शांतते आसलेल्या आंदोलनात लाठीचार्च सुरू केला. या संपुर्ण आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्यांनी या अगोदरही आंदोलन करत मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी लावून धरली होती. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जारंगे पाटील कोन आहेत ? त्यांनी आत्तापर्यंत कशा पध्दतीने आंदोलन केली जाणून घेऊयात.

* सुरवातीला पाहू मनोज जरांगे पाटील कोन आहेत ?

मनोज जरांगे पाटील हे मुळचे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालूक्यात असलेल्या मातोरी गावचे आहेत. सध्या ते जालना जिल्हयातल्या महाकाळ या गावी राहतात. वयाच्या १६ वर्षांपासुनच समाज सेवा आणि आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.१६ वर्षांपासुन मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी असायचे. मराठा आरक्षणा संदर्भात निघालेले अनेक मोर्चे आणि आंदोलनात त्यांनी नेतृत्व केलं.अनेक आंदोलन त्यांनी घडवूनही आणलेले आहेत. आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठड्यात त्यांना लोकांचा पाठींबा मिळत गेला आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व म्हणून ते समोर येऊ लागले. आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे त्यांची भाषनही चांगलीच गाजली. काल झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्चनंतर मनोज जरांगे यांच्या भाषनाची एक व्हिडिओही क्लिप प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामुळे काल पासुन सर्व माध्यामांवर त्यांचीच चर्चा सुरू झाली आहे.

* आता पाहूयात मनोज जरांगे यांनी कशा पध्दतीने आंदोलन केली :-

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची सुरवात अनेक मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून केली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आणि उपोषण व्हायला सुरवात झाली. त्यांच्या नेतृत्वात होत असलेल्या उपोषणाला आणि नेतृत्वाला लोकांचा पाठींबा मिळत गेला. त्यानंतर त्यांनी एक शिवबा संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं म्हणून पुन्हा अंदोलनं सुरू केली.

* त्यांच सर्वात गाजलेलंं आणि मोठं ठीय्या आंदोलन म्हणजे जालना जिल्ह्यातलं साष्ट पिंपळगावचं आंदोलन :-

हे आंदोलन २० जानेवारी २०२१ ला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालं. मराठा समाजाला दिलेले आश्वासन सरकार पुर्ण करत नाही, म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या आंदोलनात मराठा समाजाची बाजू सरकारने योग्य पध्दतीने मांडावी, सारथी संस्थेचे उपक्रम सुरू करण्यात यावे आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जाचक आटी लादलेल्या रद्द कराव्यात, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाची परवा केली नाही अशा अंदोलकांना नोकरीत भरती करावं अशा मागण्या घेऊन ते आंदोलनाला बसले होते.

* १०९ दिवस हे आंदोलन चाललं आणि या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठींबाही दिला :

त्यावेळी या आंदोलनाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या तर काही मागन्या लवकरच मान्य करू असं आश्वासन दिलं होतं. तेंव्हा हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे व सहकाऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आंमलबजावनी न केल्यामुळे पुन्हा जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसले. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावतून प्रतिसाद मिळत होता. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी स्वत:हा मनोज जरांगे यांच्याशी बोलून मागण्या मान्य केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलं. पण, अनेक दिवस झाले. सरकारने पुन्हा काही मागन्या मान्य केल्या नाही.

मागन्या मान्य न झाल्यामुळे त्या निषेधार्थ त्यांनी शहागड येथे जनआक्रोश मार्चा काढला. या मोर्चाला सरकारचा कुठल्याही पध्दतीचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही सरकारचा कोणत्याही प्रतिनिधीने त्या मोर्चाला भेट दिली नाही. म्हणून मनोज जरांगे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी अमरण उपोषण करण्याची सुरवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातुन केली. त्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोशनाला पाठींबा म्हणून हजारो लोक त्या ठिकाणी येत होते. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती ती म्हणजे गायकवाड समितीने आहवालात सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यातला मराठा समाज हा प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारा आहे. मराठवाड्यातले मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. 

म्हणून,मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणे आरक्षण देण्यात यावं ही मागणी त्यांनी केली होती.पण या उपोशनाला वेगळचं वळण मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. तरीही मनोज जरांगे आपल्या भुमिकेवर ठाम असुन अजुनही आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला आणि मनोज जरांगे यांना भेट देण्यासाठी राजकिय नेते हजेरी लावताना दिसत आहेत....राजकीय पक्षांच्या नेत्यांन खूपच आपुलकी वाटते....पण त्यांना हे सर्व सत्ते साठी वापरतात....विरोधक संधी मिळाली कशी भावनिक साद देता येईल ते पाहतात....पण सांविधानिक आरक्षण ओबीसी मधून मिळून देण्यास आमचा पाठींबा आहे असे बोलण्यास टाळतात...

पण,काल झालेल्या घटनेचे पडसाद चांगलेच उमटताना पहायला मिळतात. मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटनेच्या वतीने अनेक शहरांनी व जिल्ह्यांनी बंदची हाक दिली आहे. तसेच यावर महाराष्ट्रातील राजकारणही पेटलेलं पहायला मिळत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे. त्यानंतर संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व नेते मंडळींनी अंतरावाली गावांत येऊन भाषण देऊन त्यांची रोटी शिकण्याचा प्रयत्न केलाय....शरद पवार....उद्भवू ठाकरे.....अशोक चव्हाण..असो की इतर सर्व नेते हे पण मुख मंत्री असताना यांना मराठा समाजाला आरक्षण देता येत होत तर का दिल नाही....असो सत्तेतील नेते अजून आलेले दिसत नाही.....पण कोणीही म्हणाले नाही....मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे...ना शरद पवार...ना उद्भवू ठाकरे...ना अशोक चव्हाण..ना फडणवीस....ना शिंदे...ना  रोहित पवार.....कारण फक्त आंदोलनात पाठींबा....vote bank che राजकारण आहे.....जो पर्यंत OBC...मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा पाठींबा आहे असे जाहीर केले जात नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना आंदोलनात सहभागी होऊ देऊ नका....हे सगळे आपल्याला मूर्ख बनवत आहे....

आता यापुढे काय घडत हे पाहणं महत्वाचं आसणार आहे.

जय शिवराय 🙏

✍🏻अविनाश देशमुख शेवगाव

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या