🌟शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिक पौंढे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संतप्त शिवसैनिकांचे आयुक्तांना निवेदन सादर🌟
परभणी (दि.२६ सप्टेंबर २०२३) : परभणीतल्या गंगाखेड रस्त्यावरील शांती निकेतन कॉलनीतील आरोग्य क्लिनिक ते म्हाडा कॉलनी कॅनॉलकडे जाणार्या मुख्य रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देवूनसुध्दा संबंधित कंत्राटदाराने आजपर्यंत काम सुरु न केल्याबद्दल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिक पौंढे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने प्रशासक तथा आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांना उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे यांच्या नेतृत्वाखालील अशोक गिराम, अमोल ढगे, अनिश पठाण, गणेश खुपसे, शेषराव ढगे, सुरेश काळे, लक्ष्मणराव पौळ यांच्यासह शेकडो नागरीकांनी सोमवारी (दि.25) एक निवेदन सादर केले. त्याद्वारे गंगाखेड रस्त्यावरील शांतीनिकेतन कॉलनीतील रखडलेल्या त्या मुख्य रस्त्याच्या कामांकडे लक्ष वेधले. हा रस्ता पाच ते सहा नगरांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. सद्यस्थितीत तो रस्ता भयावह अवस्थेत असून त्यामुळे येथून ये-जा करतांना सर्वसामान्य नागरीकांना गेल्या दहा वर्षांपासून यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वयोवृध्द नागरीक, महिला यांचे आरोग्य व हीत लक्षात घेवून या रस्त्याच्या मजबुतीकरणासह अन्य कामे तातडीने सुरु करावीत, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली.
रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देवूनसुध्दा संबंधित कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल या शिष्टमंडळाने आश्चर्य व्यक्त करीत नागरीकांची होणारी हेळसांड ओळखून संबंधित कंत्राटदारास मनपा प्रशासनाने सक्त समज द्यावी, अन्यथा या भागातील संतप्त नागरीक मनपा कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे.....
0 टिप्पण्या