🌟अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची सर्वानुमते निवड...!


🌟या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघनायक पूज्य भदंत करुणानंद महाथेरो यांची उपस्थिती होती🌟


काल बिहारमधील बुद्ध गयाच्या मुख्य कार्यालयात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची व्यापक बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघनायक पूज्य भदंत करुणानंद महाथेरो यांची उपस्थिती होती.

या बैठकीत अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पूज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांची अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

पूज्य भदंत डॉ उपगुप्त यांचा मागील चार दशकांपासूनचा निरंतर प्रवास या निमित्ताने केंद्रीय कार्यकारिणीकडून अधोरेखित केला गेला असेच म्हणावे लागेल.

पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची अखिल भारतीय भिक्खु महासंघाच्या कार्यध्याक्ष पदी सर्वानुमते निवड झाली ही पूर्णे करासाठी अभिमानाची गोष्ट आहे डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे खूप खूप अभिनंदन..

नमो बुद्धाय !

भवतु सब्बं मंगलं !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या