🌟परभणीचे शिवसेना (उबाठा) गटाचे खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी केले जंगी स्वागत🌟
परभणी (दि.१० सप्टेंबर २०२३) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील संपर्क कार्यालयासमोर जोरदार स्वागत केले.
यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मुंडे यांच्या या यात्रेचे दुपारी तीनच्या सुमारास परभणीत आगमन झाले ,त्यावेळी त्यांचे गंगाखेड नाका पाठोपाठ वसमत रस्त्यावरील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर स्वागत केल्या गेले. भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी रामकृष्ण नगर कॉर्नर वर स्वागत केले तर वसमत रस्त्यावरील फड यांच्या पेट्रोल पंपा समोर शिवशक्ती यात्रेचे राजेंद्र मुंडे, बाळासाहेब जामगे, नाना आंबीलवादे आदीनी स्वागत करण्यात आले.त्यांच्या समावेत प्रविण घुगे, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आदी उपस्थित होते.मुंडे यांची यात्रा इथून तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ कडे रवाना झाली......
0 टिप्पण्या