🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायतीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा...!


🌟ताडकळस येथील पत्रकार फिरोज पठाण यांचा ताडकळस ग्रामपंचायतचे सरपंच/उपसरपंच व ग्रामसेवकाकडून छळ🌟


  
पुर्णा (दि.१९ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जनहितवादी पत्रकार फिरोज पठाण यांनी काही दिवसापूर्वी ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारा विरोधात जनहितार्थ काही जागृक लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन पुराव्या सहित बातमी प्रसारित केली होती व निकामी ग्रामपंचायत प्रशासनाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करीत गावातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे ग्रामपंचायत च्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता सदरील वृत्त प्रकाशित होताच सरपंच/उपसरपंचासह ग्रामविकास अधिकारी यांनी आमच्या विरोधात बातमी का प्रसारित केली याचाच द्वेष मनात ठेवून  ताडकळस ग्रामपंचायत प्रशासन सरपंच उपसरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी प्रशासनाचे सर्व नियम पायदळी तूडवून आपल्या पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक पत्रकार पठाण यांच्या राहत्या घरासमोरील टाकलेले मुरूम काढून नेले व तिथे खड्डा करून नाल्याचे स्वरूप केले व विविध माध्यमातून यांचा मानसिक छळ करीत आहे.

 शेवटी लोकशाही आहे आपल्याला न्याय मिळावा म्हणून पत्रकार पठाण यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली व झालेल्या प्रकार वर चौकशी व्हावी व कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिले परंतु दोन महिने होऊन ही आजपर्यंत कोणतीही कारवाही झाली नाही म्हणून पत्रकार पठाण यांनी 4 सप्टेंबर रोजी लक्षणीक उपोषण केले जिल्हा परिषद चे विस्तार अधिकारी यांनी, पत्रकार पठाण यांना उपोषण मागे घ्या सात दिवसांमध्ये त्यांच्यावर सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिले ‌व गटविकास अधिकारी पूर्णा यांना  सुद्धा सात दिवसात चौकशी करण्याचे  लेखी पत्र आदेश दिले, होते. परंतु 15 दिवस झाले तरी अद्यापही कोणतीही चौकशी केव्हा कारवाई झाली नाही चौकशी करण्यासाठी प्रशासन का टाळाटाळ करत आहे म्हणून पत्रकार पठाण यांनी परत जिल्हाधिकारी यांना नािवेदन देऊन विस्ताराधिकारी यांनी लेखी पत्रर देऊन सुद्धा, गटविकास अधिकारी यांनी का चौकशी केली नाही व संबंधितावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पत्रकार पठाण व पत्रकार संघटना लवकरच आमरण उपोषण करणार असा इशारा दिला व तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड यांनी सात दिवसाच्या आत ताडकळस ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून कारवाई करावी दोशी आढळल्यास त्यांना पदमुक्त करावे अन्यथा सात दिवसानंतर वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असे आव्हान आहे

पत्रकार पठाण यांचे दोन बंधू देश सेवेसाठी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहे वअशा देशभक्त व धार्मिक परिवाराला न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या