🌟सरपंच हरिभाऊ कदम यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन केला शिक्षकांचा गौरव🌟
पुर्णा (दि.०५ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील सातेगाव जिल्हा परिषद शाळा येथे आज मंगळवार दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिना निमित्त कंठेश्वर सातेगाव ग्रामपंचायत कडून सरपंच हरिभाऊ कदम यांच्या वतीने सर्व सन्माननीय शिक्षक यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला मुख्याध्यापक श्री राठोड सर व श्री अडबलवार सर यांचा सरपंच हरिभाऊ कदम उपसरपंच काशिनाथ ठाकूर ग्रामसेवक श्री वहिवाळ साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या याप्रसंगी पोलीस पाटील गोविंदराव ठाकूर रमेश ठाकूर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी ठाकूर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माणिका ठाकूर उपाध्यक्ष नारायण ठाकूर शाळा व्यवस्थापन समिती कंठेश्वर चे अध्यक्ष सुनील कदम उपाध्यक्ष विठ्ठल कदम व ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम व भगवान ठाकूर लक्ष्मण ठाकूर नागोराव शिवनखेडे व समस्त गावकरी उपस्थित होते....
0 टिप्पण्या