🌟परभणी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी ३३ केंद्रांवर रविवारी लेखी परीक्षा...!


🌟परभणी जिल्ह्यात ८ हजार ८३४ उमेदवार पात्र🌟

परभणी (दि.२२ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात कोतवाल पदासाठी रविवार (दि.२४) रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान परभणी जिल्ह्यातील ३३ केंद्रावर सामान्य क्षमता चाचणी विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आले असून, अद्यापही ज्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही, त्यांनी परभणी एनआयसीच्या संकेतस्थळावर जावून ते डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

परभणी जिल्ह्यात कोतवाल पदाच्या १८६ जागा भरावयाच्या असून, त्यासाठी ८ हजार ८३४ उमेदवारांचे अर्ज लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. परभणी तालुक्यात २७ जागांसाठी सर्वाधिक १९७५ अर्ज पात्र ठरले असून, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३० जागांसाठी तुलनेने कमी (१६१०) अर्ज पात्र झाले आहेत. पूर्णा २१ पदांसाठी १०९३, पालम १४  जागांसाठी  ६९९, गंगाखेड १८ जागांसाठी  ७८५, सोनपेठ १६ जागांसाठी ४७७, पाथरी  १५ जागांसाठी ५६९, मानवत १८ जागांसाठी ६२० आणि सेलू तालुक्यात कोतवालाच्या २७ जागा भरण्यासाठी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी १००६ उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरले आहेत. 

पोदार इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानसाधना एनईईटी अँड जेईई फाऊंडेशन, जिंतर रोड, धर्मापुरी, अरविंदो अक्षरज्योती विद्यालय, परभणी, सेंट ऑगस्टीन इंग्लिश स्कूल, जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, पाथरी रोड, डॉ. मोहम्मद इक्बाल उर्दू हायस्कूल, काद्राबाद प्लॉट, कै. रावसाहेब जामकर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर रोड, कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शारदा विद्यालय व महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, आनंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खानापूर फाटा, संत तुकाराम महाविद्यालय, प्रेरणा इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी, श्री. शिवाजी लॉ कॉलेज, श्री. शिवाजी कॉलेज, कै. मुंजाजी शिंदे विद्यामंदिर, श्रीहरी नगर, खानापूर फाट्याजवळ,  सुमनताई गव्हाणे हायस्कूल, गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, श्री. शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, नूतन विद्या मंदिर मुलांचे व मुलींचे हायस्कूल, सरोजिनी नायडू रोड, नागराज मंदिराजवळ, परभणी या २४  ठिकाणी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

त्याशिवाय शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल, नानलपेठ, भारतीय बाल विद्या मंदिर प्रभावती नगर, जुना पेडगाव रोड, क्वीन्स स्कूल बेलेश्वर मंदिराजवळ, नांदखेडा रोड, एन. व्ही. एस. मराठवाडा हायस्कूल शिवाजी नगर, वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सावित्रीमाई फुले मुलींचे विद्यालय, लोकमान्य नगर सुपर मार्केटजवळ, भारतीय बाल विद्यामंदिर ममता कॉलनी, बाल विद्या मंदिर हास्कूल वैभवनगर आणि श्री. सारंग स्वामी विद्यालय, विवेक नगर, वसमत रोड, परभणी या ९ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.   

परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून परिसरात कोणत्याही व्यक्ती, वाहनास प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टियकोनातून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके संबंधितांनी बंद ठेवावीत. हे आदेश परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत. हे आदेश रविवारी, 24 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायकांळी 6.00 वाजेपर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

ज्या उमेदवारांना कोतवाल पदभरतीचे प्रवेशपत्र अद्यापही प्राप्त झाले नाही त्यांनी Parbhani.nic.in  या संकेतस्थळावर जावून https://parbhani.techcohort.com/  येथून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे......   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या