🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील पुरा किल्ला परिसरात गांधी जयंतीला स्वच्छता अभियान....!


🌟पुरा किल्ला परिसराची स्वच्छता ०२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०-०० वाजता करण्यात येणार आहे🌟

परभणी (दि.२६ सप्टेंबर २०२३) : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून येथील पुरा किल्ला परिसराची स्वच्छता ०२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०-०० वाजता करण्यात येणार आहे. 

या उपक्रमात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी - विद्यार्थिनी व कर्मचारी सहभागी होणार आहेत तरी पाथरीच्या‌ पुरा किल्ला परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य सी. सी. देशपांडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या