🌟तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा या दुर्घटने सुदैवाणे बचावला🌟
गंगाखेड (प्रतिनिधी) - गंगाखेड तालुक्याच्या बहुतांश भागात आज शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली दरम्यान तालुक्यातील भेंडेवाडी तालुका गंगाखेड येथे दुपारी चार वाजता मयत ओंकार किशन घुगे वय 14 जखमी गोविंद विनायक घुगे तेवीस सुनिता काशिनाथ शेप जखमी वय ४८ रेणुका काशिनाथ शेप जखमी वय 27 व तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील शेत आखाड्यावर आज सायंकाळी चार वाजता वीज पडल्याने आईसह मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा सुदैवाने बसवला याबाबत अधिक माहिती अशी की दुपारी तीन वाजता पासून तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने चे आगमन झाले विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली यादरम्यान सायंकाळी चार वाजता डोंगर पिंपळा येथील शेतकरी विठ्ठल दत्तराव कतारे यांच्या शेत आखाड्यावर वीज पडली या दुर्घटनेत विठ्ठलराव व त्यांची पत्नी सविता कतारे वय 40 तसेच मुलगी निकिता वय 18 या दोघींचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा या दुर्घटने सुदैवाणे बचावला आहे
0 टिप्पण्या