🌟पुर्णा तालुक्यातील सोन्ना ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे शाळकरी/विद्यार्थीनींचे आरोग्य धोक्यात...!


🌟जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरासह गावात सर्वत्र अस्वच्छता : जिवघेण्या डेग्यू सदृष्य आजाराची अनेकांना लागन🌟


पुर्णा (दि.०१ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौ.सोन्ना ग्राम पंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय व अनागोंदी कारभारामुळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी परिसरासह गावात देखील जागोजाग साचलेली कचऱ्यांची ढिगार साचलेल्या नाल्यांमुळे गावात डेंग्यू सारख्या जिवघेण्या आजाराने पाय फैलावण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरासह आसपासचा परिसर ग्राम पंचायत प्रशासनाने तात्काळ स्वच्छ करावा अशी  सुचना शालेय शिक्षण व्यवस्थापण समिती अध्यक्ष गणेश रंगनाथराव कदम यांनी ग्रामपंचायत सरपंच/ग्रामविकास अधिकारी दिली होती परंतु त्यांच्या सुचनेकडे देखील ग्राम पंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी/विद्यार्थीनींना डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे.


ग्रामपंचायत सोन्नाचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी शालेय शिक्षण व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या सुचनेवर अंमलबजावणी केली असती आणि परिसराची स्वच्छता मोहीम राबवली असती तर डासांचा प्रादुर्भाव वाढला नसता व अनेक विद्यार्थ्यांना डेग्यू सदृष्य आजाराची लागण झाली नसती असे मत गावकऱ्यांतून व्यक्त होत असून जिल्हा परिषद शाळेतील जवळपास दहा/पंधरा विद्यार्थी डेंग्यू सदृष्य आजाराने त्रस्त झाल्याचे समजते......  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या