🌟खुनाच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण🌟
परभणी (दि.२१ सप्टेंबर २०२३) - परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील बसस्थानक परिसरातील काटेरी झुडपात आज गुरुवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी १०-०० वाजण्याच्या सुमारास ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली असून गळा आवडल्याच्या खुणा तसेच डोक्यावर दगड घालून जखमी केल्याचे दिसून येत असल्यामुळे सदरील इसमाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिसरात मागील २० दिवसात दुसरी घटना घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिंतूर हे महामार्गावर वसलेले शहर असल्यामुळे येथील बसस्थानकावर नेहमी प्रवाश्यांची मोठी गर्दी असते. बसस्थानक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली निरदर्शनास येत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मागील २० दिवसांमध्ये बसस्थानक परिसरात एकामागे एक दोन खून झाल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. पहिल्या खुनाची घटना २ सप्टेंबर रोजी घडली तर दुसरी घटना आज गुरुवार २१ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. खून झालेल्या ३५ वर्षीय अनोळखी इसमाची ओळख पटली नाही पण पोलिसांच्या तपासातून तो सातारा जिल्ह्यातील असल्याचा समजते. सदरील इसमाचा गळा आवळून डोक्यावर दगड घालून निर्घृणपणे खून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफने, उपविभागीय पोलीस अधिकारी प्राची कर्णे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, सपोनि सय्यद, परभणी गोपनीय शाखेचे हवालदार जिया खान आदींनी घटनास्थळी भेट घटनेचा पंचनामा करून घटना स्थळावर श्वान पथक आणि फिंगर प्रिंट पथकाला प्रचारण करण्यात आले होते पण मरेकरूचा सुगावा लावण्यात पथकाला यश मिळाले नाही. मात्र 20 दिवसाच्या आत बसस्थानक परिसरात सलग दुसरा निर्घृण खून झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती....
0 टिप्पण्या