🌟मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विकास दाभाडे यांचे स्तुत्य उपक्रम....!


🌟खाकी वर्दीत सुद्धा माणूसच असतो🌟 


फुलचंद भगत

वाशिम :-माणूस उभा आहे खाकी वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला असेच काहीसे दृश्य मनसे वाहतूक जिल्हा संघटक विकास दाभाडे यांच्या माध्यमातून आज आपणास पहावयास मिळाले आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी मंगरूळपीर शहरातील होणारे गणेश विसर्जन शांततेत साजरा व्हावा व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे या उद्देशाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदारांन सह SRP, RCP, RPC, WRPC, यांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आले होते. गणेश विसर्जनाचा हे रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आणि खाकी वर्दीत सुद्धा माणूसच असतो याचे भान आणि जान ठेवून मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक जिल्हा संघटक विकास दाभाडे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तैनात बंदोबस्ताच्या ठिकाणी असलेल्या पोलीसांना केळे वाटप करण्यात आले व पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे प्रयत्न केले तथा माणुसकी जोपासून खाकी वर्दीत सुद्धा माणूसच असतो याची जाण करून देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.या ऊपक्रमामुळे दाभाडे यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशीम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या