🌟वसंतराव नाईक मराठवाडा कषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्‍यांचा सत्कार...!


🌟शेतकरी आहेत म्हणूनच आम्ही आहोत अशी भावनाही कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी यावेळी व्यक्त केली🌟 


परभणी (दि. १५ सप्टेंबर २०२३) - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी अनेक शेतकर्‍यांनी त्यांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समावेत त्यांच्या सुविज्ञ पत्नी जयश्री मिश्रा यांचीही उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी मात्र आपल्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित सर्व शेतकर्‍यांचा यथोचित सन्मान केला. 


शेतकरी आहेत म्हणूनच आम्ही आहोत, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड, प्रकाश हारकळ, पंडित थोरात, रामेश्वर साबळे, शिवाजी आवरगंड, आत्माच्या स्वाती घोडके, विठ्ठल चापके, विजय जंगले आदी शेतकरी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या