🌟पुर्णेतील रुग्नांच्या सेवेसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन...!

 


🌟शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिंदे यांनी केले नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन🌟


पुर्णा (दि.२८ सप्टेंबर २०२३) - पुर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भव; योजने अंतर्गत मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन शिंदे यांनी केले आहे.

 तर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांसाठी आयुषमान भव; योजना सुरू केली असून ,ही योजना माहे डिसेंबर पर्यंत कार्यान्वित राहणार आहे.या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची दर आठवड्याला मोफत आरोग्य तपासणी करून दुर्धर आजारावर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.या योजनेचा शुभारंभ येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० सप्टेंबर रोजी होणार असून रुग्णालयाच्या वतीने तज्ञ चिकित्सकांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमवार, निवासी वै.अ. डॉ.कदम, सर्जन डॉ.शाहबाज देशमुख, डॉ.सारंग नंदकिशोर, डॉ शिंदे, डॉ.प्रशांत खराटे, आदींची उपस्थिती लाभणार आहे.सर्व रोग निदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन शिंदे, डॉ.गणेश काचगुंडे, डॉ.नागेश‌ देशमुख , डॉ.नितीन नरवाडे,श्रीमती डॉ.भायेकर, डॉ.नईम, डॉ.ठाकूर, डॉ.कानडकर,श्रीमती सिंड्रेला झांबरे,श्री.चव्हाण,अब्दुल वहीद फारुकी आदीं परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या