🌟मराठा आरक्षणाला दिला आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पाठींबा🌟
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे संवेदनशील व कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड तालुक्यातील मौजे.इसाद, मौजे.धारासूर आणि पालम शहर येथे सुरू असलेल्या मराठा समाज बांधवांच्या साखळी व लाक्षणिक उपोषणास भेटी दिल्या. उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्या आणि प्रश्न समजून घेतले. तसेच मार्गदर्शनही केले जालन्याच्या अंतरवाली सराटी येथून सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग राज्यभर पोहोचली आहे. त्यास पाठींबा देण्यासाठी गावोगावी मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे.
यावेळी यावेळो राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, उबेद खान पठाण, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, सरपंच उद्धवराव सातपुते, भगवानराव सातपुते, दत्तराव भोसले, सुदर्शन भोसले,प्रतापराव कदम, दगडूराव जाधव, निवृत्ती कदम, विक्रम कदम, अतुल जाधव, बबलू कदम,कुलदिप जाधव, राजेभाऊ कदम, तुकाराम जाधव,यांच्यासह आंदोलक मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या