🌟भ्रष्ट कारभाराला विरोध करणाऱ्या नागरिकांची दिशाभूल...उपोषणकर्त्यांच्या मात्र कोपराला गुळ ?🌟
परभणी जिल्ह्यात भ्रष्टाचाराला भ्रष्ट आणि बेईमानशाही कारभाराला जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारने देखील हिरवा कंदिल दाखवला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगर परिषदा/नगर पंचायतींना जिल्हा नियोजन समितीसह नगर विकास मंत्रालय व विविध राज्यसभा/विधान परिषद सदस्यांच्या विशेष निधीतून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील या विकासनिधीचा विकासाच्या दृष्टीने योग्य वापर न करता बोगस विकासकामांची मालीका चालवून प्रशासकीय टक्केवारांनी चोरांच्या घषात घालण्याचा पराक्रम केल्याने सर्वत्र 'विकासाच्या आयचा घो झाल्याचे' निदर्शनास येत आहे.
परभणी जिल्ह्यात पुर्णा नगर परिषद देखील बोगस विकासकामांची मालीका चालवून कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधी वाट लावण्यात आघाडीवर असतांना कोट्यावधी रुपयांच्या या बोगस विकासकामांच्या विरोधात असंख्य तक्रारी दाखल झाल्यानंतर देखील प्रशासनाकडून बोगस विकासकामांच्या तक्रारींची चौकशी तर सोडाच उलट तक्रारदारांच्या तक्रारींना सोईस्कररित्या केराची टोपली दाखवण्यासह या बोगस कामांच्या चौकशीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करणाऱ्या उपोषणार्थींना लेखी स्वरुपात आश्वासन दिल्यानंतर देखील त्या आश्वासनांची अंमलबजावणी न करता त्यांची शुध्द फसवणूक केल्या गेल्याचा गंभीर प्रकार पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून झाल्याचे उघडकीस आले आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा शहरातील विविध भागात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निकृष्ट व बोगस विकासकामांची चौकशी करून संबंधित विकासकाम पुन्हा नव्याने करून संबंधित भ्रष्ट गुत्तेदारांसह बोगस विकासकामांची बिल अदा करणाऱ्या भ्रष्ट बेईमान नौकशहांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माझी पुर्णा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजु नारायनकर यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा नगर परिषद प्रशासकीय इमारती समोर दि.०९ आगस्ट २०२३ रोजी क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषणास बसले होते तब्बल दोन दिवसांच्या कालावधी नंतर तिसऱ्या दिवसी त्यांच्या उपोषणाची नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी वरिष्ठांचे बरडन येत असल्यामुळे दखल घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करीत दि.११ आगस्ट २०२३ रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ०१ प्रभाग, क्रमांक ०४,प्रभाग क्रमांक ०६,प्रभाग क्रमांक ०७,प्रभाग क्रमांक ०९ मधील बोगस विकासकामांच्या सखोल चौकशीसह पुर्णा नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ०५ व प्रभाग क्रमांक ०६ मध्ये चार विंधन विहिरीचे काम निधी उपलब्धतेनुसार आवश्यक त्या ठिकाणी करण्यात येईल,तक्रारदाराच्या तक्रारीतील सोनार गल्ली,पंचशील नगर,अवैस कॉलनी येथील निकृष्ट व बोगस सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती करुन त्यावर सिंगल लेअर काँक्रेट करण्यात येईल,शहरातील स्ट्रिट लाईट पोलसाठी केबल अंथरणे करीता झालेल्या खोदकामांच्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती काँक्रेटद्वारे करण्यात येईल,तक्रारदाराने दिलेल्या तक्रार अर्जातील कामांमध्ये गुत्तेदार दोषी आढळून आल्यास संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई संदर्भात अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असे लेखी स्वरुपात मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी उपोषणकर्त्यांना देऊन उपोषण उठवले होते या घटनेला उद्या ११ सप्टेंबर २०२३ रोजी तब्बल एक महिन्यांचा कालावधी पुर्ण होत असतांना देखील मुख्याधिकारी पौळ यांनी यातील एकाही आश्वासनाची अद्याप पुर्ती न केल्यामुळे त्यांचे व भ्रष्ट गुत्तेदारांचे हितसंबंध किती पक्के जुळलेले आहेत यावरून सिध्द होत असून यावरून असे स्पष्ट होते की पुर्णेत कोट्यावधीचा विकासनिधी तरी विकासाची बत्तीगुल ? विकासाच्या नावावर नागरिकांच्या डोळ्यात धुळ..अन् भ्रष्ट कारभाराला विरोध करणाऱ्या नागरिकांची दिशाभूल...उपोषणकर्त्यांच्या मात्र कोपराला गुळ ?
✍🏻विशेष वृत्त : चौधरी दिनेश (रणजीत)
0 टिप्पण्या