🌟या वाहनांचे वितरण राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले🌟
पुणे - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने वितरित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एकूण ४६ गाड्या १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत खरेदी करण्यात आल्या आहेत. या वाहनांचे वितरण राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १२ सप्टेंबर) कौन्सिल हॉल पुणे येथे करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागातील अनेक अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात कामकाजासाठी फिरण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत ४६ वाहने खरेदी करण्यात आली असून त्यांचे वितरण राज्यातील सर्व भागातील अधिकाऱ्यांना आज होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाला निश्चित गती मिळणार आहे.
या कार्यक्रमाला आरोग्य विभागातील डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण, पुणे, डॉ. प्रतापसिंह सारनिकर, सहसंचालक (हि.व ज. रो), पुणे, डॉ. राधाकृष्ण पवार, उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ, डॉ.अनिरुध्द देशपांडे, उपसंचालक (आयईसी ब्युरो), पुणे, श्री. कैलास करळे, उपसंचालक परिवहन, पुणे, डॉ.येमपल्ली, जिल्हा शल्य चिकित्सक पुणे, श्री. राहुल धर्माधिकारी, सेवा व्यवस्थापक इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ह्युंदाई मोटर्स कंपनीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यात ह्युंदाई कंपनीला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल श्री. केतन सोमाणी, डिलर प्रिंसिपल, सोमाणी ह्युंदाई यांनी मा. मंत्री महोदय व आरोग्य विभागाचे आभार मानले.
0 टिप्पण्या