🌟हजारोच्या संख्येने जैन बांधव,भगिनी सहभागी झाले होते🌟
परभणी (दि.२१ सप्टेंबर २०२३) -सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी सिध्दीतप आराधना महोत्सवानिमित्त शहरातून मोठी शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले होेते.
अहिंसा परमो धर्म की जय,तपस्विनी की जयजयकार, गुरुजी हमारो अंर्तज्ञान-हमे आपो आशिर्वाद अशा घोषणांनी आज गुरुवार दि.२१ सप्टेंबर २०२३ रोजी संपूर्ण परभणी शहर दुमदुमले. महापर्युषण पर्वाच्या सांगतेनिमित्त सकल जैन समाजाच्या सिध्दीदायक सिध्दीतप आराधना महोत्सवानिमित्त शहरातून मोठी शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारोच्या संख्येने जैन बांधव, भगिनी सहभागी झाले होते.
सुभाष रोडवरील श्री. गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिरात चातुर्मासानिमित्त सकल जैन समाजाचे परमपुज्य श्री भक्तीसुरीश्वरजी महाराज यांच्या समुदायातील व परमपुज्य विद्युत्प्रभाश्रीजी महाराज यांच्या शिष्या परमपुज्य सुयशप्रज्ञाश्रीजी महाराज, सौम्यप्रज्ञाश्रीजी महाराज, विनीतप्रज्ञाश्रीजी महाराज, जिनदर्शनाश्रीजी महाराज, दिव्यदर्शनाश्रीजी महाराज, संस्कारनिधीश्रीजी महाराज यांच्या सानिध्यात शहरात प्रथमच सिध्दी तप आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होता. या महोत्सवाच्या सांगतेनिमित्त मंदिरापासून गुरुवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. ढोलपथक, लेझीम पथकाच्या निनादात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव, महिला पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले. गांधीपार्क येथील भगवान महावीर यांच्या स्तंभाला नमन करुन शोभा यात्रेचा समारोप हरिप्रसाद मंगल कार्यालयात झाला. त्याठिकाणी चार्तुमासा निमित्त आलेल्या तपस्वींनी मार्गदर्शन केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन कऱण्यात आले होते. दरम्यान ठिकठिकाणी भारतीय बाल विद्या मंदिरच्या लेझीम पथकाने तसेच ढोल पथकाने प्रात्यक्षिके सादर केली. पर्युषण पर्वात तप केलेले 35 जण रथावर आरुढ झाले होते.
या शोभायात्रेत सकल जैन समाजाचे अध्यक्ष सुभाषचंद्र सिंघवी, सुभाषचंद्र कोटेचा, दिलीप जोगड, राजेंद्र पोकर्णा, शितल साखला, अनिल साखला, उदयराज जैन, अभयराज जैन, विनय बाठीया, महावीर जोगड, निलेश कुचेरिया, महाविर कुचेरिया, कमलचंद गोलेच्छा, प्रदीप गोलेच्छा, अशोक मुथा, महावीर कुचेरिया, राजेश सिंघवी, धनराज कांकरीया, रितेश जैन यांच्यासह हजारो जैन समाज बांधव, वयोजेष्ठ, बालगोपाल सहभागी झाले होते....
0 टिप्पण्या