🌟त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व या तिन्ही गावचे नागरिक यांचा गावाशी संपर्क काही काळापर्यंत तुटला होता🌟
पुर्णा (दि.२६ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यात आज मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी जोरदार पाऊस झाल्याने पुर्णा-परभणी लोहमार्गावरील गेट नंबर १३२ मध्ये पावसाचं पाणी तुडूंब भरल्याने पुर्णा फुकटगाव कानेगाव ममदापूर आदीं गावांना जाणारा रस्ता बंद झाल्याने शाळेतील विद्यार्थी व या तिन्ही गावचे नागरिक यांचा गावाशी संपर्क काही काळापर्यंत तुटला होता.
पुर्णा ते परभणी लोहमार्गावर असलेला गेट क्रमांक १३२ हा फुकटगाव येथील अंडरग्राउंड झाल्यामुळे या पुलाखाली तुडुंब पाणी साचून शाळेतील विद्यार्थी नागरिक हे त्या पाण्यामध्ये अडकले आहेत त्यांना घरी येण्यासाठी वाहने येत नाहीत त्या पाण्यामधून पायी प्रवास करण्यासाठी भीतीचे वातावरण झाले आहे.
सदरील पुलाचे काम हे काही काळासाठी पूर्ण करावे अशी सवलत देऊन सुद्धा या गुत्तेदाराने पुलाचे काम अपूर्ण ठेवल्याने या गावातील लोकांना रहदारीस मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तथा या पुलाखालचे पाणी काढून देण्यासाठी गावातील नागरिक व शाळकरी मुले यांनी पुढाकार घेऊन हे पाणी काढून देण्यासाठी नाली समोरील पत्राचे द्वार काढून घेतले त्यावेळी प्रचंड प्रवाहाने वाहणाऱ्या पाण्यातून एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यास जीवितवास हानी झाल्यास याचा जबाबदार कोण असेल असा प्रश्न नागरिकांमधून उद्भवत आहे अपूर्ण काम करून पुन्हा पावसाळा संपल्यानंतर काम पूर्ण करू म्हणणाऱ्या गुत्तेदारावर कायदेशीर कार्यवाही शासन का करत नाही असा प्रश्न नागरिकांमधून उद्भवत आहे.....
0 टिप्पण्या