🌟महावितरण विभागाचे ढिसाळ नियोजन🌟
राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना पूर्णा तालुक्यातील गौर येथे गणेश भक्तांना चक्क अंधारातच गणेश विसर्जन करण्याची वेळ आली आहे.. गावात मागील दोन ते तीन दिवसापासून दोन रोहित्र जळाल्याने अर्धेगाव अंधारातच आहे.
सणासुदीचे दिवस असतानाही महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे गणेश भक्तांना चक्क अंधारातच कृत्रिम उजेड करून श्री गणेशांचे विसर्जन करण्याची वेळ आली आहे..
गावात लाईट उपलब्ध नसल्याने बालगोपालांच्या गणेश उत्सवा दरम्यान विविध कलागुणांचे सादरीकरण देखील करता न आल्याने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे....
0 टिप्पण्या