🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील श्री.सोमेश्वर महाराजांच्या चरणी 'रूद्र-अभिषेक'...!


🌟दुष्काळी परिस्थिती व पावसाचा खंड थांबून विपुल प्रमाणात प्रजन्य दृष्टी व्हावी या उदात्त हेतूने करण्यात आला 'रूद्र-अभिषेक'🌟


पुर्णा (दि.०३ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असलेले गौर या गावातील 'श्री सोमेश्वर महादेव मंदिर संस्थान' येथे आज रविवार दि.०३ सप्टेंबर २०२३ रोजी पवित्र अश्या श्रावण मासा-च्या निम्मीताने 'अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र गौर च्या वतीने श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व पावसाचा खंड थांबून विपुल प्रमाणात प्रजन्य दृष्टी व्हावी या उदात्त हेतूने ग्रामदेवता श्री सोमेश्वर महाराजांच्या चरणी "रूद्र-अभिषेक सेवेचे "आयोजन केले होते व तसेच सेवामार्गातील प्रश्न-उत्तर विभागाच्या माध्यमातुन समस्या-निवारण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौर गावातील व पंचक्रोशी तील अनेक सेवेकरी, ग्रामस्थ व नागरिक या सेवेमध्ये सहभागी झाले होते. सदर सेवा रुजू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पावसाला सुरुवात झाल्याने सेवेकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण होते......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या