🌟धर्माबाद बन्नाळीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने यशाच्या उंबरठ्यावर....!


 🌟माजी सरपंच साई पाटील बन्नाळीकर यांचं प्रतिपादन🌟 

धर्माबाद, प्रतिनिधी

धर्माबाद (दि.२४ सप्टेंबर) - तालुक्यातील ज्वलंत प्रश्न असणाऱ्या बन्नाळी गावचे पुनर्वसन जिल्हाभर गाजले. मागच्या पूर परिस्थितीमुळे गावाला पाण्याचा वेढा आला आणि संपूर्ण गाव त्या समस्येला तोंड दे तीन दिवस जिल्हा परिषद शाळेत काढले याची माहिती घेण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी गावकऱ्यांची समस्या समजून घेण्यासाठी पूर परिस्थितीची पाहणी केली आणि पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे ही बाब मनावर घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवक मंडळीच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीचा संदर्भ घेत प्रा.रवींद्र चव्हाण यांनी अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व युवकांना घेऊन मंत्रालय गाठले मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दालनामध्ये बन्नाळी पुनर्वसनाची कैफियत मांडली .

 आज त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालय स्तरावरून आदेशित झालेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवकुळे मॅडम यांनी पुनर्वसनासाठी निवड केलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी कुलकर्णी साहेब व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बन्नाळी  हे गाव गाठले पुनर्वसनासाठी निवड  केलेल्या जमिनीची पाहणी करताना साई पाटील  ग्रामपंचायत सदस्य साईनाथ करे, सदस्य प्रतिनिधी नवीन कुमार पाटील उपस्थित राहून पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांना माहिती सांगितली ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकृत करण्यात आलेल्या आहेत त्यांना चालू नियमाप्रमाणे देयक रक्कम लवकरात लवकर अदा करावी अशी विनंती केली आणि साई  पाटील बन्नाळीकर यांनी रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयाला निश्चित यश येईल असे प्रतिपादन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या