🌟राज्य शासनाद्वारे राज्यात एकूण 511 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापना🌟
परभणी (दि.17 ऑक्टोंबर) : जिल्ह्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले असून, या दहा केंद्रांचे गुरुवार, दि.19 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धाटन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले आहे.
परभणी तालुक्यातील पोखर्णी व टाकळी कुंभकर्ण, गंगाखेडमधील राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील बोरी मानवतमधील ताडबोरगाव, पाथरीतील लिंबा, पालम तालुक्यातील पेठशिवणी, पुर्णेतील ताडकळस, सेलू तालुक्यातील वालुर आणि सोनपेठमधील खडका येथे ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, प्रगतशील शेतकरी, व्यापारी तसेच महिला, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर कमी व्हावे तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा. त्याद्वारे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून बेरोजगारांचे जीवनमान सुधारावे, या दृष्टिकोनातून मागणीप्रमाणे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाद्वारे राज्यात एकूण 511 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.....
0 टिप्पण्या