🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित महिला बेरोजगारांसाठी मंगळवार दि.17 ऑक्टोंबर रोजी महारोजगार मेळावा.....!


🌟शहरातील श्री मंगल कार्यालय स्टेशन रोड येथे मेळाव्याचे आयोजित🌟

परभणी (दि.12 ऑक्टोंबर) : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवती, महिला, दिव्यांग व अल्पसंख्यांक महिलासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवार दि.17 ऑक्टोंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला महारोजगार मेळावा’ शहरातील श्री मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून गरजूंसाठी मेळाव्याचे आयोजन केले असून, विविध नामांकित मोठे उद्योजक, कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या https://www.mahaswayam.gov.in/  संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नावनोंदणी केल्यानंतर तो अर्ज व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन मंगळवार, ( दि.17) रोजी सकाळी 9:30 वा श्री मंगलकार्यालय लक्ष्मी नारायण मंदिराच्या जवळ, स्टेशन रोड परभणी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी मेळाव्यास सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 02452 220074 व 9860015383, 9623020934, 98815246439890828797 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या