🌟उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती,योग्यता प्रमाणपत्रासाठी अपॉईंटमेंटमध्ये बदल करण्यात आले🌟
परभणी (दि.०१ ऑक्टोंबर २०२३) : परभणी जिल्ह्यात ईद-ए-मिलाद सणाच्या सुट्टीतील बदलामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती,योग्यता प्रमाणपत्रासाठी अपॉईंटमेंटमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता या अनुज्ञप्तीसाठी 3,4 आणि 5 ऑक्टोबर 2023रोजी वाहनधारकांना यावे लागणार आहे.
शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी 3 ऑक्टोबर रोजी तर अनुज्ञप्ती चाचणी 3,4 आणि 5 ऑक्टोबर 2023 रोजी संगणकीय प्रणालीवर कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 29 सप्टेंबर रोजी घेतलेल्या अपॉईंटमेट घेतलेल्या वाहनधारकांनी संबंधित मोटार वाहन निरीक्षकांशी संपर्क करून आपले वाहन पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी चाचणीसाठी आणण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी केले आहे.....
*****
0 टिप्पण्या