🌟एका साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आपल्या जऊळका येथे पूर्ण केले🌟
फुलचंद भगत
वाशिम :- मंगरुळपीर येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय मध्ये 14 वर्षापासून शिक्षक घडवण्याचा कार्य करत असताना असलेले प्राध्यापक दीपक जयस्वाल यांना मानाची समजल्या जाणारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएचडी पदवी नुकतीच प्राप्त झाली.यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालयामध्ये कार्य करत असताना सरांनी उच्च शिक्षणाची आवड जोपासली.
एका साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आपल्या जऊळका येथे पूर्ण करून आपली पदवी शिक्षण शिवाजी शिक्षण संस्था अकोट येथे पूर्ण करून त्यानंतर बीएड केले, बीएड मध्ये ते विद्यापीठातून द्वितीय आले होते, त्यानंतर त्यांनी विद्यापीठांमध्ये एम एड केले त्यामधे सुद्धा ते विद्यापीठांमध्ये प्रथम आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही लगेच त्यांना यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय मंगरुळपिर येथे सहाय्यक प्राध्यापक पदी नोकरी लागली व तेथून त्यांनी शिक्षणाचा आलेख दरवर्षी वाढतच ठेवला त्यानंतर त्यांनी एम ए - इतिहास ,समाजशास्त्र, अर्थशास्त्र ,व तत्त्वज्ञान हे नोकरी करूनच पूर्ण केले हे करताना सुद्धा त्यांनी दोन विषयांमध्ये विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला सोबतच त्यांचं सेट हे सुद्धा झाले आहे. एवढं असूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करण्याचा हेतू मनास वाढवून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे पदुत्तर शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. जी एल गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएचडी पूर्ण केली, संशोधनाचा चा विषय सुद्धा हा त्यांनी वाशिम जिल्ह्यातील पदवी विद्यार्थ्यांच्या रोजगारीच्या संदर्भात निवडला त्यासाठी त्यांनी वाशिम जिल्हा येथे कार्य केले व आपले संशोधन कार्य पूर्ण केले. वाशिम जिल्ह्यातील पदवीधारक विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्कीलच्या माध्यमातून रोजगार कशा पद्धतीने अवगत होईल याची विविध कौशल्य आपल्या संशोधन कार्यातून शिकून विद्यार्थ्यांना रोजगार दृष्टिकोन उपलब्ध करून दिला. यासाठी त्यांना मोतीराम शिक्षण प्रसारक मंडळ याचे अध्यक्ष माननीय सुभाषरावजी ठाकरे व सचिव चंद्रकांत ठाकरे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच यशवंतराव चव्हाण कला व शिक्षण महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर कानेरकर सर यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालयातील प्राचार्य झिमटे,यशवंतराव चव्हाण बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चव्हाण व त्यांचे सहकारी प्रा .चक्रनारायण प्रा.गवई, प्रा. होणाळे, प्रा इंगोले, प्रा वाडनकर, संदीप ठाकरे ,निलेश ठाकरे, भागवत टोपले, अक्षय पवार ,मंगेश भोयर यांचे अनमोल असे सहकार्य केले .
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या