🌟शेतकरी/शेतमजूर/रोजमजूरांच्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्था चालकांचा कौतुकास्पद संघर्ष🌟
🌟शेतकरी/शेतमजूर/रोजमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदानाचा शाळारुपी वटवृक्ष निर्माण करणाऱ्या ज्ञानदात्यांना त्रिवार मानाचा मुजरा🌟
✍🏻विशेष वृत्त :- चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी/शेतमजूर/रोजमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदानाचे वटवृक्ष निर्माण करणारे ज्ञानदाता तथा छत्रपती संभाजी राजे विद्यालय मौ.सुहागण या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हिराजी भोसले सर आणि त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे संस्थेचे उपाध्यक्ष बळीरामजी भोसले सर संस्थेचे सचिव दिलीपजी माने सर यांनी सन १९९५ यावर्षी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या निर्मळ हेतूने छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाने श्री छत्रपती संभाजी राजे विद्यालय सुहागण या शाळेची स्थापना केली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बळीरामजी भोसले यांनी दिलेल्या ७० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीतून कट्ट्याची शाळा उभारण्यात आली होती अवघ्या काही कालावधीनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एच.एल.भोसले सर यांनी आपली प्लाट विकून शाळेची सुसज्ज व सर्व मुलभूत सुविधायुक्त भव्य इमारत उभी केली.
पुर्णेतील अभिनव विद्या विहार प्रशाला या नामांकित शिक्षण संस्थेत प्रथमतः सामान्य शिक्षक व नंतर हेडमास्तर म्हणून कर्तव्य बजावत असतांना शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थी/विद्यार्थीनींसह पालकवर्गाच्या मनावर देखील आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आपण शहरी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतांना आपल्या ग्रामीण भागातील अन्नदाता शेतकरी शेतमजूर तसेच रोजमजूरांच्या लेकरांच्या शैक्षणिक भविष्यासाठी देखील काहीतरी केले पाहिजे या महत्वाकाक्षेतून त्यांनी पुर्णा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील मौ.सुहागण येथे उभारलेल्या छत्रपती संभाजी राजे विद्यालयाच्या छोट्याश्या वृक्षाचे रूपांतर आज मोठ्या वटवृक्षात झाल्याचे निदर्शनास येत असून संस्थाध्यक्ष तथा आदर्श व्यक्तिमत्व श्री भोसले सर यांची शिस्तप्रियता उपाध्यक्ष श्री बळीरामजी भोसले सर यांचे सुसंस्कार व सचिव दिलीपजी माने सर यांच्यासह मुख्याध्यापक एम.जी.कल्याणकर सर यांचे अनुशासन यातून ग्रामीण भागात छत्रपती संभाजी राजे विद्यालयाच्या नावानं एक आदर्श शिक्षण संस्था निर्माण झाली असे म्हणायला हरकत नाही.
पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागण या गावातील छत्रपती संभाजी राजे विद्यालयात शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी यात एका विद्यार्थीनीचा समावेश असून जे आज घडीला पोलीस प्रशासनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत तर तिन विद्यार्थी राज्य राखीव दलात (एस.आर.पी) कर्तव्य बजावत आहेत तर चार विद्यार्थी भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडीत आहेत तर दोन विद्यार्थी पाटबंधारे विभागात कर्तव्य बजावत असून यातील एक विद्यार्थी अभियंता पदावर कार्यरत आहे तर याच छत्रपती संभाजी राजे विद्यालयातील एक विद्यार्थी आयकर विभागात कर्तव्य बजावत असून छत्रपती संभाजी राजे विद्यालय सुहागण या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणासह सामाजिक/राष्ट्रीय एकात्मतेसह धार्मिक संस्कार व देशभक्तीचे पाठही शिकवतात ही निश्चितच अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल.
पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी/शेतमजूर/रोजमजूरांच्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यात आघाडीवर असलेल्या छत्रपती संभाजी राजे विद्यालय या इयत्ता ०५ वी ते १० वी पर्यंत वर्ग असलेल्या शैक्षणिक संस्थेत परिसरातील बरबडी,आव्हई,देगाव,पळशी,लिंगी,हैयातनगर या सात गावांतील तब्बल ५१६ विद्यार्थी शिक्षण घेत असून यात २६८ विद्यार्थी तर २४८ विद्यार्थी विद्यार्थीनींचा समावेश आहे या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांना कधीही खाजगी शिकवणी लावण्याची आवश्यकता भासली नाही कारण या शाळेतील शिक्षक आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांना शाळेच्या वेळेत अत्यंत दर्जेदार शिक्षण तर देतातच यानंतर देखील त्यांचे अतिरिक्त क्लास घेऊन त्यांना शिकवलं जातं त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी म्हणूनच नावलौकिक मिळवतो शाळेत प्रत्येक वर्षी स्वतंत्र दिन १५ ऑगस्ट व प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर प्रत्येक वर्षी ०२ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी १२० प्रश्नांची प्रश्न पत्रिका प्रकाशित करुन १२० मार्कांची स्पर्धा परिक्षा घेतली जाते या स्पर्धा परीक्षेत असंख्य विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सादर करतात त्याच प्रमाणे एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत देखील या शाळेतील दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून वर्षांला १२ हजार रुपये तर सार्थी परिक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून वर्षाला ९ हजार ५०० रुपये आर्थिक अनुदान मिळते या शाळेतील विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत देखील आवर्जून सहभाग नोंदवून प्रावीण्य मिळवतात मग ती सकाळ चित्रकला स्पर्धा असो की अन्य कुठलीही या शाळेतील विद्यार्थी आघाडीवर असतात त्यामुळे ग्रामीण भागातील एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून छत्रपती संभाजी राजे विद्यालय सुहागण या शाळेने नावलौकिक मिळवले आहे.
छत्रपती संभाजी राजे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व मुलभूत सुविधा अर्थात विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ निर्जंतुक शुध्द पिण्याचे पाणी,विद्यार्थी व विद्यार्थीनीं साठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुसज्ज सुंदर व इमारत परिसरातील निसर्गरम्य वातावरण विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष,खेळाचे मैदान आदी सर्वच सुविधा संस्था प्रशासनाने उपलब्ध करून दिल्याने या शैक्षणिक संस्थेचा कारभार अत्यंत कौतुकास्पद असल्याचे निदर्शनास येते छत्रपती संभाजी राजे विद्यालयात एकूण १२ शिक्षक कार्यरत असून यात शिक्षिकांचा समावेश आहे तर ०४ सेवक व ०१ लिपीक असे एकूण १७ कर्मचारी आपले कर्तव्य अत्यंत प्रभावीपणे बजावत आहेत.
छत्रपती संभाजी राजे विद्यालय मौ.सुहागण या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हिराजी भोसले सर उपाध्यक्ष बळीरामजी भोसले सचिव दिलीपजी माने सर यांनी आपल्या जिद्द परिश्रम आणि सेवाभावनेतून या शाळेला अक्षरशः नंदनवन बनवल्याने त्यांच्या या जिद्द परिश्रम आणि सेवाभावनेला शतशः प्रणाम.....
0 टिप्पण्या