🌟भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची अ.भा.भिक्कु संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या जन्मदिनी सत्काराचे आयोजन🌟
🌟 भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचं समस्त जिवन आणि कार्य मानवते साठी समर्पित - आमदार डॉ.राहू्ल पाटील
पुर्णा : पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी काल सोमवार दि.०९ ऑक्टोबर २०२३ या रोजी दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची अखिल भारतीय भिक्कू संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वधर्मीयांच्या वतीने त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची नुकतीच आखिल भारतीय भिक्कु संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली दि.०९ सप्टेंबर हा त्यांचा जन्म दिन असल्याने त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भिक्कु संघाची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ नेते उत्तमराव कदम हे होते यावेळी प्रमुख पाहुणे परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा गट) आमदार डॉ.राहुल पाटील, शिवसेना (उबाठा गट) सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर,लोकनेते विजय वाकोडे,डॉ.दत्तात्रय वाघमारे पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे,शांतीलाल मुथा शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख विशाल कदम माजी नगरसेवक संतोष एकलारे दैनिक लोकपत्रचे संपादक डॉ.गणेश जोशी,प्रा.डॉ.भीमराव खाडे,उद्योजक मिलिंद सावंत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायणराव पिसाळ पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे गौतम मुंढे,भीम प्रकाश गायकवाड,माजी सरपंच शिवाजी साखरे,कॉन्ट्रॅक्टर यशवंत उबारे प्रा.राम धबाले आदींची उपस्थिती होती.
यावेळी अखिल भारतीय भिकुसंघाच्या नाम फलकाचे अनावरण आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते झाले.नागरी सत्कार समारंभाला संबोधित करताना परभणी मतदार संघाचे शिवसेना (उबाठा गट)आमदार डॉ.राहुल पाटील यांनी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या त्यागमय जीवनाचा रोमहर्षक इतिहास विशद केला वयाच्या १५ व्या वर्षी काष्याय वस्त्र परिधान करून भिक्कु जीवनाचं त्याग सेवा समर्पण व्रत स्थ पने संपूर्ण भारत व भारता बाहेर धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचं काम ते करत आहेत माझ्या ते गुरुस्थानी आहेत.त्यांनी समाजातील उपेक्षित शोषित पीडित वंचित घटकातील सामान्य माणसाची सेवा केली.गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सर्वोत्परी मदत करण्याचं काम ते करत असतात.विहारा मधील चालवली जाणारी अभ्यासिका हे त्यांच्या कार्याच मृत्युमंत प्रतिक आहे.
माझ्याकडे त्यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही.त्यांच्या सांगण्यावरून माझ्या शिक्षण संस्थेमध्ये अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला.परभणी जिल्ह्यातील सामाजिक सद्भभाव प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी आंबेडकरी समाजाच्या ज्वलंत समस्या रोजगाराचे प्रश्न यावर भाष्य केले.भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची निवड अखिल भारतीय भिकू संघाच्या कार्याध्यक्षपदी झाल्यामुळे बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात येईल त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग याबाबतीत होईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पोलीस उपाधीक्षक प्रवीण मोरे दैनिक लोकपत्र नांदेड आवृत्तीचे संपादक डॉ गणेश जोशी,विशाल कदम,प्रा.डॉ.भीमराव खाडे सोपान बोबडे महाराज राजेश धूत माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित आदींनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.देवगिरी वृत्त संभाजीनगर औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेल्या भदंत डॉ उपगुप्त महाथेरो गौरव विशेष अंकाचे विमोचन या प्रसंगी करण्यात आले.दैनिकाचे संपादक व परभणी जिल्हा प्रतिनिधी राहुल ढेरे यांनी या साठी विशेष परिश्रम घेतले.भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले मला समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी माझ्यावर प्रेम केले.त्याची पावती या सत्कार सोहळ्यातून दिसून आली.
बुद्ध धम्म त्याची तत्व प्रणाली सर्वांनीच त्याच पालन केले पाहिजे.या मध्येच जगाचे कल्याण आहे.कार्य क्रमास ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक नामदेव राजभोज माजी उपनगराध्यक्ष यादवराव भवरे अनिल खर्ग खराटे माजी नगरसेवक देवराव खंदारे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मा खंदारे मधुकर गायकवाड मुकुंद भोळे अशोक धबाले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड पत्रकार विजय ब गाटे मुकुंद पाटील इंजिनीयर पी.जी रणवीर दिलीप गायकवाड मुगाजी खंदारे मिलिंद कांबळे अमृत मोरे टी झेड कांबळे शिवाजी थोरात ज्ञानोबा जोंधळे आदींची उपस्थिती होती .स्वागत गीत शाहीर विजय सा तोरे यांनी गायले.प्रास्ताविक भदंत पायावांश यांनी तर सूत्र संचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले .
आभार रि.पा.ई.नेते प्रकाश कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य उमेश बारहा टे अतुल गवळी रामू भालेराव सूरज जोंधळे राजू जोंधळे विनोद कणकुटे गौतम सोनुले व महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या