🌟महिलांनी आपल्या अडचणी सोडविण्यासाठी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा - जिल्हा महिला बालविकास अधिकारी
परभणी (दि.१५ ऑक्टोंबर) : जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. समस्याग्रस्त, पीडितांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावेत.
यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महिलांनी आपल्या अडचणी सोडविण्यासाठी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे......
*****
0 टिप्पण्या