🌟महाराष्ट्रासह उत्तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे महाराष्ट्रात दुपारी ३.०४ वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण दिसेल🌟
मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होते. अशा वातावरणातच ऑक्टोबरमध्ये सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल विद्यार्थी,शिक्षक, आकाशनिरीक्षक, शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींसाठी असेल, अशी रास्त अपेक्षा आहे. पृथ्वीवरून पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. सद्यःस्थितीत गुरु, शुक्र आणि शनी हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. ता. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त, ता.६ ऑक्टोबरला रात्री ७ वा. इंटरनॅशनल स्पेसस्टेशन दर्शन, ता.७ ऑक्टोबरला बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. ता.७, ८ व ९ रोजी रात्री ड्रेक्रोनिड तारका समूहातून आणि ता.२१, २२ रोजी मृग नक्षत्र समुहातून दरताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील. ता.१४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे; ता.२८ रोजी मध्यरात्रीनंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सुमारे सव्वा तास बघता येईल, हे विशेष उल्लेखनीय! असा हा श्री एन. कृष्णकुमार जींचा ज्ञानवर्धक लेख... संपादक.
महाराष्ट्रासह उत्तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रात दुपारी ३.०४ वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण दिसेल. राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधूनही कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू शकणार आहे. गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा दुर्मिळ योग आला आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय? तर अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागते. ही ग्रहणे तीन प्रकारची असतात, शाळेत याविषयी आपण शिकलो आहोतच. ती अशी खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणे आहेत. पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. एरवी चंद्र सूर्यापेक्षा अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाराने एकसारखे दिसतात आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचे बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकते. पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो. याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होते, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी रिंग ऑफ फायर, अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावे दिली आहेत.
हे ग्रहण वेगळे आहे, कारण एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणे पाहता येतात. त्यातील एखाद दुसरेच खग्रासग्रहण असते आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ असते. भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा पुढचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे. कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट( छायेखाली असलेल्या प्रदेशातच "रिंग ऑफ फायर" दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळते. येत्या शनिवार-रविवारी दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था यंदा दक्षिण सुदान, इथियोपिया, येमेन, सौदी अरेबिया, ओमान, पाकिस्तान या देशांतील काही भागातून दिसेल.
मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होते. अशा वातावरणातच ऑक्टोबरमध्ये सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल विद्यार्थी, शिक्षक, आकाशनिरीक्षक, शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींसाठी असेल, अशी रास्त अपेक्षा आहे. पृथ्वीवरून पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. सद्यःस्थितीत गुरु, शुक्र आणि शनी हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. ता. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त, ता.६ ऑक्टोबरला रात्री ७ वा. इंटरनॅशनल स्पेसस्टेशन दर्शन, ता.७ ऑक्टोबरला बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. ता.७, ८ व ९ रोजी रात्री ड्रेक्रोनिड तारका समूहातून आणि ता.२१, २२ रोजी मृग नक्षत्र समुहातून दरताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील. ता.१४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे; ता.२८ रोजी मध्यरात्रीनंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सुमारे सव्वा तास बघता येईल, हे विशेष उल्लेखनीय!
भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून हे ग्रहण कंकणाकृती स्थितीत दिसणार आहे. तर भारताच्या बाकीच्या भागात खंडग्रास स्थितीत ग्रहण पाहायला मिळेल. महाराष्ट्रातून खंडग्रास ग्रहण दिसणार असून साधारण ७० टक्के सूर्य झाकला गेलेला पाहायला मिळेल. ग्रहण पाहण्याची वेळ अशी की, भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ग्रहणाची सुरूवात होईल. पण आपण नेमके कुठल्या देशातून आणि कुठल्या शहरातून ग्रहण पाहणार आहोत, त्यानुसार वेळेत थोडाफार फरक पडू शकतो. भारतातून साधारण सकाळी सव्वा दहा ते दुपारी पावणेदोन या वेळेत हे ग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतात हरयाणाच्या कुरुक्षेत्रात सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी सूर्यग्रहणाची सुरूवात होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिट ते १२ वाजून २ मिनिटे अशी साधाराण एक मिनिटापर्यंत ग्रहणाची कंकणाकृती अवस्था पाहता येईल. तर दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटलेले असेल. महाराष्ट्रातून खंडग्रास ग्रहण दिसण्याच्या वेळा अशा आहेत- मुंबई - १०.०१ ते १३.२८, पुणे- १०.०३ ते दुपारी १३.०३, नाशिक- १०.४ ते १३.३३, नागपूर- १०.१८ ते १३.५१, औरंगाबाद- १०.०७ ते १३.३७ ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते. एरवी अनेक हौशी खगोलप्रेमी ग्रहण पाहण्यासाठी जिथे ते सर्वोत्तम स्थितीत दिसेल, अशा जागी जातात. पण तरीही ग्रहणकाळात कुरुक्षेत्र किंवा अन्य ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता टाळता येणार नाही, असे वाटते. उत्तर भारतात ग्रहणकालामध्ये तीर्थस्नानाची प्रथा आहे. कुरुक्षेत्र हे आधीच आपल्याकडे महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ग्रहणकालात तिथल्या ब्रह्मसरोवरात तीर्थस्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाकाळात या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागली होती, हे विशेष!
गैरसमज बाजूला सारून ग्रहणाचा आनंद घ्यावयास हवा. ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात, म्हणून सूर्यग्रहण होतं असं पूर्वी लोकांना वाटत होतं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात, असाही एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सगळे पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत. पण अशा प्रथा व गैरसमज फारच चुकीचे आहेत. ग्रहण सुटले म्हणून आंघोळ करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही. ग्रहणात जेवू नये, ग्रहणात झोपू नये, ग्रहणात मलमूत्र विसर्जन करू नये, असेही सांगितले जाते. मात्र त्यात काहीही तथ्य नाही.
शनी दर्शनाचा योगसूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि वलयांकित ग्रह शनी हा रात्रीच्या प्रारंभी ते पहाटेपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दर्शन देत आहे. शनी ग्रह सद्या कुंभ राशी समूहात आहे. त्यानंतर रात्री साडे आठनंतर पूर्व क्षितिजावरच सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरू ग्रह हा आपल्याला अगदी ठळकपणे पहाटेपर्यंत पाहता येईल. त्यानंतर पहाटेच्या निवांत वेळी पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह चांगल्यापैकी बघता येईल. या तिन्ही ग्रहांचे दुर्बिणीतून दर्शन केल्यास शनी ग्रहाचे सुंदर वलय, आणि गुरू ग्रहाचे चार चंद्र चांगल्यापैकी पाहता येतील. पहाटेच्या वेळी शुक्र ग्रहाच्या चंद्रासारख्या कला बघता येतील. असा हा अनोखा अवकाशीचा नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवूनच घ्यावा.
श्री एन. कृष्णकुमार जी, से.नि.शिक्षक.
पोटेगावरोड, गडचिरोली.
फक्त मोबा- 7775041086.
0 टिप्पण्या