🌟महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा परभणी दौरा....!

 


🌟उद्या सोमवार दि.१६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०-४५ वाजता नांदेड येथून गंगाखेडकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील🌟

परभणी (दि.१५ ऑक्टोंबर) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे उद्या सोमवार, (दि.१६) रोजी सकाळी  १०.४५ वाजता नांदेड येथून गंगाखेडकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांचे दुपारी १२ वाजता गंगाखेड येथील गोदावरी तांडा येथे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र -२०२३ या कार्यक्रमास उपस्थित राहतील.त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांची वेळ राखीव राहील. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे दुपारी ३ वाजता शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या