🌟आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने नमुद आरोपींना दि.१९ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली 🌟
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन जउळका येथे फिर्यादी नामे अनिल धोडुजी सोनुने वय ४९ वर्ष, व्यवसाय शिक्षक रा.बाळखेड ता रिसोड जि.वाशिम यांनी रिपोर्ट दिला की, फिर्यादीचा भाउ नामे दिलीप धोंडजी सोनुने वय ५४ वर्ष रा.शेलुफाटा मालेगांव ता.मालेगांव जि.वाशिम हा दिनांक ०९/१०/२०२३ रोजी जिल्हा परीषद शाळा बोरगांव येथे जात असताना कोणीतरी अज्ञात इसमाने शिक्षक दिलीप धोंडुजी सोनुने यांना मारहाण करून जिवाने मारण्याचे ऊददेशाने अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले असता दिलीप धोंडुजी सोनुने यांना इलाजा कामी भरती केले असता त्याचा इलाजा दरम्यान मृत्यु झाला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अप नं. ३०१ / २३ कलम ३०२,२०१ भादवी प्रमाणे दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये मृतक दिलीप धोंडजी सोनुने वय ५४ वर्ष रा.मालेगांव यांची पत्नी नामे अनुप्रिया सोनुने मुलगा नामे निलेश सोनुने मुलगी कु किरण सोनुने यांनी त्याचे बयाणामध्ये शेतीचे वादा वरून त्याचे नातेवाईक नामे ज्ञानेश्वर रामदास सोनुने रा. बाळखेडा तसेच सतीष रामदास सोनुने रा. बाळखेडा यांनी मृतकास मारहाण करून त्याच जिवाने मारण्याचे उद्देशाने पेटवुन ठार केले असावे असा संशय व्यक्त केल्याने गुन्हयाचे तपासात संशयीत इसम नामे ज्ञानेश्वर रामदास सोनुने याचा शोध घेणे कामी मा.बच्चन सिंग साहेब पोलीस अधिक्षक वाशिम, मा. भारत तांगडे साहेब, अपर पोलीस अधिक्षक वाशिम तसेच श्रीमती निलीमा आरज मॅडम ऊपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर याचे आदेशान्वये वेगवेगळे पाच पथक तयार करून तपासकामी रवाना करण्यात आले होते. त्यापैकी पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे तैनातीस असलेले पोउपनि दिनकर राठोड व पो.स्टॉफ असे तांत्रीक साधनाचा उपयोग करून औरंगाबाद येथे संशयीत इसम ज्ञानेश्वर रामदास सोनुने यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर संशयीत इसम याने जबाब सांगीतले की, दिनांक ०९/१०/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा सुमारास आपला भाउ नामे सतीष रामदास सोनुने चे सह मृतकास घटनास्थळी मारहाण करून पेट्रोल टाकुन पेटवुन जिवाने ठार मारले असे आपले बयाणात सांगीतल्याने आरोपी नामे ज्ञानेश्वर रामदास सोनुने वय ३८ वर्ष रा. बाळखेडा ता. रिसोड जि.वाशिम यास दिनांक १२/१०/२०२३ रोजी २२/४२ वा अटक करण्यात आली. नमुद आरोपीस दिनांक १३/१०/२०२३ रोजी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने नमुद आरोपीचा पि.सि.आर दिनांक १९/१०/२०२३ मंजुर केला आहे.सदर गुन्हयातील दुसरा आरोपी नामे सतिष रामदास सोनुने वय ३२ वर्ष रा. बाळखेडा ता रिसोड जि.वाशिम यास स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील पोउपनि शब्बीर पठाण व पो.स्टॉफ यांनी हिजवडी पुणे येथुन ताब्यात घेवुन दिनांक १३/१०/२०२३ रोजी ताब्यात दिले असता नमुद आरोपीस दिनांक १३/१०/२०२३ रोजी अटक करून नमुद आरोपीस १४/१०/२०२३ रोजी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने नमुद आरोपीचा पि.सि.आर दिनांक १९/१०/२०२३ मंजुर केला आहे. सदर गुन्हयाचा तपास मा.बच्चन सिंग साहेब पोलीस अधिक्षक वाशिम, मा.भारत तांगडे साहेब, अपर पोलीस अधिक्षक वाशिम तसेच श्रीमती निलीमा आरज मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी प्रदीपकुमार राठोड व तपास पथक पोहेकॉ विजय सोनुने,पोहेकॉ पंजाब घुगे, नापोकॉ सुनिल काळदाते, पोका दिपक कावरखे, पोकों अमोल पाटील, पोकॉ अमोल गि-हे, पोकों गोपाल कव्हर, पोकों विष्णु इढोळे, पोकॉ नवल चरावडे हे करीत आहे....
0 टिप्पण्या