🌟निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करावा - जिल्हा कोषागार अधिकारी सुनिता सुंकवाड


🌟वृद्ध कलावंतांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे🌟

परभणी : जिल्हा कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयात असल्याबाबत नोव्हेंबर महिन्यात दाखला सादर करणे आवश्यक आहे. हयात दाखला नोंदविण्यासाठी बँकेत यादी पाठविली असून, तो बँकेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुनिता सुंकवाड यांनी केले आहे.

निवृत्तीवेतन सुरु ठेवण्यासाठी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्यक्ष बँकेत उपस्थित राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी रकान्यात स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच पुनर्विवाह व पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी. या पद्धतीशिवाय बायोमॅट्टीक्स जीवन प्रमाण दाखला देण्यासाठी  http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर  सुविधा उपलब्ध आहे. या यादीत स्वाक्षरी अथवा अंगठा अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केला नसलेल्यांचे डिसेंबरपासून निवृत्तीवेतन अदा केले जाणार नसल्याचे श्रीमती सुंकवाड यांनी सांगितले आहे.

* वृद्ध कलावंतांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे :-

पंचायत समिती परभणी अंतर्गत वृद्ध कलावंत मानधन घेणा-या सर्व कलावंतांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विहीत नमुन्यात पंचायत समिती परभणी येथील समाज कल्याण विभागात हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या