🌟अन् कधीकाळी संपूर्ण जिल्ह्यात सधन असलेला हा तालुका कायमस्वरूपी लागला देशोधडीला🌟
🌟पुर्णा तालुक्याचे भविष्य उध्वस्त करण्यात परभणी जिल्ह्या प्रमाणेच नांदेड जिल्ह्याचाही मोठा सहभाग🌟
✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा शहरासह तालुक्याला लागलेला अतिसंदनशीलतेचा कलंक काही केल्या मिटता मिटत नसून तो दिवसेंदिवस गडदच होत असल्याचे निदर्शनास येत आहे शहरासह तालुक्यातील वाढती बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेले अनैतिक व्यवसाय व यातून उद्भवणाऱ्या द्वेषभावना व या सर्व प्रकारांना पडद्यामागील तत्व भ्रष्ट राजकीय दहशतवाद्यांकडून मिळणारे खतपाणी तसेच शहरासह रेल्वे परिसर व संपूर्ण तालुक्यात परजिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांचा सातत्याने होणारा मुक्त संचार त्यामुळे कधीकाळी संपूर्ण जिल्ह्यात सधन असलेला हा तालुका कायमस्वरूपी देशोधडीला लागून अतिसंवेदनशील तालुका म्हणून नावारूपाला येत अक्षरशः देशोधडीला लागल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा तालुक्याचा मागील भुतकाळ पाहता असे निदर्शनास येते की परभणी/हिंगोली हा संयुक्त जिल्हा असताना व पुर्णेचा समावेश वसमत तालुक्यात असतांना पुर्णा/गोदावरी या दोन नद्यांचा समावेश असलेल्या पुर्णेतील कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्र,व्यापार क्षेत्र सर्वात सधन होते साडेतीन चार दशकांपूर्वी शहरात जवळपास चार ते पाच ऑइल मिल,कॉटन मिल,पोहा मिल,मुरमुरा फॅक्टरी असे अनेक उद्योग असल्याने या काळात मजुरांना सहज रोजगार उपलब्ध होत होता परंतु कालांतराने या उद्योग क्षेत्राला वाळवी लागल्याप्रमाणे या ऑइल मिल कॉटन मिल मुरमुरा फॅक्टरी पोहा मिल बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याकारणाने उद्योग धंद्यांची जागा पहाता पहाता अवैध धंद्यांनी घेतली व उद्योग व्यवसाय निर्माण करुन रोजगार निर्माण करणाऱ्यांची जागा माफिया/तस्कर/भ्रष्ट राजकीय दडपशहांनी घेतली त्यामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध कारोभाऱ्यांच्या अन् तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या दुष्ट दुराचारी प्रवृत्तींच्या एकाधिकारशाहीला सुरूवात झाली आणि तरुण पिढीने देखील उलट्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली अवैध दारू अवैध गांजा अवैध गुटखा अवैध रेती तस्करी आदींमधून मिळणाऱ्या अमाप पैशामुळे या परिसरात तरुणांची अनेक टोळकी तयार झाली याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा जंक्शन वरील सर्वच महत्त्वाची उपविभागीय स्तरावरील रेल्वे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित झाल्याने त्या काळात असलेली पाच हजार ते साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत घटत गेल्याने व्यापार धंद्यावर याचा फार मोठा परिणाम झाला व्यापार धंद्याप्रमाणेच कृषी क्षेत्र ही सर्वात आघाडीवर असल्याने याचा दुष्परिणाम कृषी क्षेत्रालाही भोगावा लागला मागील अनेक वर्षापासून या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्राच्या जागेवर गौण खनिज रेती/दगड गिट्टी/माती/मुरुम तस्करांनी वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केल्याने नदीकाठच्या शेतातील पिक उत्पादनांवर देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्यास सुरुवात झाली. नदीकाठच्या परिसरामध्ये रेती/माती तस्करांच्या टोळ्या गाढवांच्या झुंडी मोठ्या प्रमाणात वावरायला लागल्यामुळे व असंख्य वाहनातून वाळू तस्करी व्हायला लागल्याने नदीपात्रातील पाण्याचा स्त्रोत घटत गेल्याने शेती उद्योगावर जणूकाही काळाची झडपच पडली त्यामुळे तालुक्यातील चांगले उद्योग संपुष्टात येऊन अवैध व्यवसायांनी उद्योगांचे स्थान घेतले पुर्णा तालुक्याचे भविष्य उध्वस्त करण्यात परभणी जिल्ह्या प्रमाणेच नांदेड जिल्ह्याचाही मोठा सहभाग असल्याचे दिसून येते कारण निझाम व इंग्रज राजवटीत मराठवाड्यातील सर्वात मोठे व अत्यंत महत्त्वाचे जंक्शन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुर्णा जंक्शन येथील महत्त्वाची रेल्वे कार्यालय तसेच सर्व प्रकारच्या सुविधा अर्थात मुबलक प्रमाणात जमीनीसह कार्यालयासाठी सुसज्ज इमारती, अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी शेकडो निवासस्थान,पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था असतांनाही पुर्णेकरांच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालय नांदेड येथे नव्याने कोट्यावधी रुपयांची जमीन/संपत्ती खरेदी करीत उभारण्याचा महामुर्खपणा केला जात असतांना तसेच रेल्वे कोच निर्मिती कारखाना उभारणीला लातूर जिल्ह्यात मान्यता देण्यात येत असतांना परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष पदाधिकारी तथाकथित समाजसुधारक व्यापारी संघटनांना देखील तमाशगीर बनून बघ्याची भुमिका साकारतांना पुर्णेकरांनी बघितले तत्पूर्वी जागा उपलब्ध करून न दिल्याने पुर्णेकरांच्या हक्काचा पुर्णा सहकारी साखर कारखाना हिंगोली जिल्ह्यातील वसमतला,थर्मल पावर सेंटर बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथला हा सर्व गंभीर प्रकार म्हणजे कुंपणाणेच शेत गिळल्यागत नव्हे काय ?
पुर्णा तालुक्याची मागील पार्श्वभूमी पाहता असे निदर्शनास येते की या तालुक्यातील जनतेने ज्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनीच या तालुक्यातील सर्वसामान्यांचा विश्वासघात करीत या संपूर्ण तालुक्याचे वाटोळे करीत या तालुक्यातील तरुण पिढीसमोर बेरोजगारीचा गंभीर अजगरी प्रश्न निर्माण करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त केले असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही नाईलाजास्तव भ्रष्ट बेईमान माफिया तस्कर शहांच्या बरबटलेल्या हातातील बाहुले झालेली तरुणाई देशी/विदेशी दारू,मानवी शरीरास अपायकारक असलेली केमिकल युक्त शिंदी.गांजा/अफीम,व्हाईटनर,वैद्यकीय क्षेत्रात पुर्वी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोसन टेनसह अन्य घातक औषधींच्या नशेच्या आहारी जावून हळुवारपणे आपला मोर्चा गुन्हेगारीकडे वळवतांना दिसत असून पडद्यामागील राजकीय दडपशाहीच्या इशाऱ्यावर धार्मिक सामाजिक उत्सवांमध्ये सशस्त्र उपद्रव माजवून वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करतांना पाहावयास मिळत आहे.
पुर्णा शहरातील आनंद नगर परिसरात दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीत केवळ नाचण्याच्या अगदी शुल्लक कारणावरून घडलेला प्रकार नमूद परिस्थितीचाच एक भाग म्हणावा लागेल संपूर्ण पुर्णा शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज असतांना गोपनीय विभाग देखील परिस्थितीवर नजर ठेवून असतांना तसेच शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीचा चोख बंदोबस्त असतांना मद्यधुंद सात ते आठ सशस्त्र तरुण अगदी शुल्लक कारणावरून धुमाकूळ घालत गणपती मंडळाच्या अध्यक्षासह चार जनांना अमानुषपणे हिंस्र पशूंना लाजवेल त्या पध्दतीने भोसकतात ही निश्चितच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब म्हणावी लागेल पुर्णेकरांचे नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल की हा गंभीर प्रकार शहरातील मुख्य बाजारपेठेत विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडला नाही नसता या घटनेनंतर प्रचंड धुमाकूळ माजला असता या गंभीर घटनेची सखोल चौकशी झाल्यास अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात परंतु नेहमी प्रमाणे याही घटने मागील गंभीर प्रश्नांची उत्तरं शेवटी गुलदस्त्यातच राहणार आणि शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता प्रतिष्ठीत नागरिकांसह आम्हीं 'कलम करंटे' देखील नेहमी प्रमाणे गांधी बापूंच्या तिन माकडांप्रमाणे 'बुरा मत देखो....बुरा मत कहों....बुरा मत सुनों' या तिन सुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत राहणार यात तिळमात्र शंका नाही.....
0 टिप्पण्या