🌟चिखली येथे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन....!

 


🌟श्री रेणुकादेवी मंदिरात दररोज सकाळी ८ ते ११ वाजे दरम्यान श्री ज्ञानेश्वरी पारायण🌟       


  

 चिखली : १५ ऑक्टोबर पासून श्री रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने चिखलीचे ग्राम दैवत श्री रेणुकादेवी संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थांच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरच्या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . १५ ऑक्टोबरला विधीवत घट स्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली .श्री रेणुकादेवी मंदिरात दररोज सकाळी ८ ते ११ वाजे दरम्यान श्री ज्ञानेश्वरी  पारायण हरिभक्त महाराज शालीकरामबाबा भुसारी   यांच्या नेतृत्वात व दुपारी तीन ते सहा वेळेत श्रीदेवी भागवत कथा सखारामपंत  सराफ यांच्या वाणीतून होत आहे. रात्री आठ ते दहाच्या दरम्यान गरबा , भजन , देवीचा जागर हे विविध कार्यक्रम संपन्न होत आहे. 


१७ ऑक्टोबरला रखुमाई भजनी मंडळ  खामगाव यांचे भजन झाले . १८ ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान प्रमाणे श्री स्वामी समर्थ गुरु मंदिर ट्रस्टच्या  वतीने ( स्वर्गीय दीपक भाऊ गुळवे समर्पित) दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते . शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते दहा दरम्यान षष्ठीचा गोंधळ गोंधळी लक्ष्मण गाताडे पिंपळवाडी यांच्या वाणीतून होणार आहे रविवार दिनांक 22 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता होमहवन होणार आहे. सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी महानवमीचा उपास असून श्री रेणुकादेवी नवरात्रौत्सवाची समाप्ती, आयुष पूजन  आयुध पुजन, नवरात्रौत्थापन, उपवास , पारणा,   महानवमी उपवास होईल.  मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त अभिषेक पूजा, गंगाजल कावड यात्रा, शस्त्रपूजन,श्री रेणुकादेवी दर्शन ( थोरांचे आशीर्वाद )व दसरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे . दिनांक २५ ऑक्टोबरला एकादशीनिमित्त सकाळी दहा ते बारा श्रीभागवत गीता पाठ दिनांक २६ ऑक्टोबरला द्वादशी निमित्ताने सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले तरी या सर्व  कार्यक्रमाला चिखली शहरासह चिखली तालुक्यातील सर्व भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  या  कार्यक्रमांचा या सर्व कार्यक्रमाचां लाभ व  आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री रेणुकादेवी संस्थान व बचानंद स्वामी संस्थांचे अध्यक्ष राजाभाऊ खरात , उपाध्यक्ष गोपालभाऊ शेटे , सचिव वसंतराव शेटे, विश्वस्त सचिनभाऊ बोंद्रे यांनी   केले आहे.                                                            

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या