🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली माहिती🌟
परभणी (दि.३१ ऑक्टोंबर) : परभणी जिल्ह्यात आतापर्यंतच्या कुणबी नोंदणीच्या रेकॉर्ड तपासणीत एकूण १ हजार ५१५ कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंगळवारी दि.३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी एका पत्रकार परिषदेतून दिली.
निवृत्त न्यायमुर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने कुणबी नोंदणीचे रेकॉर्ड तपासणीसह ते वितरीत करण्या संदर्भात समिती नियुक्त केली. या समितीने जिल्हानिहाय दौरे करीत नागरीकांकडून त्या संबंधिचे दस्तऐवज मागविले. हे दस्तऐवज तपासण्याचे काम सुरु केले. या समितीच्या परभणी जिल्हा दौर्या दरम्यान जिल्ह्यात मागील महिनाभरात एकूण 20 लाख 75 हजार दस्त तपासणी केल्यानंतर सुमारे 1 हजार 515 नोंदी कुणबीच्या आढळून आल्या आहेत. या नोंदीचा जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात येवून गेलेल्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.
* ऑक्टोबर 1967 पुर्वीच्या काळातील आढळल्या नोंदी :-
जिल्हा प्रशासनाने मागील महिनाभरात ऑक्टोबर 1967 पुर्वीच्या 20 लाख 75 हजार दस्तांचे रेकॉर्ड तपासले आहे. या तपासणी दरम्यान दीड हजारावर कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी मिळून आल्या आहेत.
* 80 टक्के नोंदी मोडी लिपीतील :-
प्रशासनाकडून केलेल्या रेकॉर्ड तपासणीमध्ये 80 टक्के नोंदी ह्या मोडी लिपीतील असल्याने मुबईहून एका मोडी लिपीच्या तज्ज्ञ व्यक्तीस बोलावण्यात आलेले आहे. आणखी एका मोडी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असून ते दोघेजण प्रत्येक तहसील कार्यालयात जावून नोंदी तपासणे, त्यांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम करीत आहेत. काही दस्त हे उर्दू भाषेत असल्याने ते उर्दूच्या तज्ज्ञांकडून तपासण्यात आले आहेत. केवळ महसूलच नाही तर सर्व विभागांचे रेकॉर्ड तपासण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार दस्त तपासणीचे जवळपास 90 टक्के काम पुर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली......
0 टिप्पण्या