🌟या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार🌟
पुर्णा (दि.२७ ऑक्टोंबर) : प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "महिला आणि आरोग्य" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील " वस्र व रचना शास्त्र" विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. सुनीता काळे (पवार) राहाणार आहेत. बीजभाषक म्हणून भोपाळ येथील क्षेत्रीय शैक्षणिक संस्थेच्या सहयोगी प्रा.डॉ.मिनू पांडे या भूमिका मांडणार आहेत तर प्रमुख अतिथी नांदेड येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ तथा जेष्ठ साहित्यीक डॉ. वृषाली किन्हाळकर, अमरावती येथील बी.एड.महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.वनिता काळे उपस्थित राहणार आहेत. एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात होणाऱ्या चार सत्रात महिलांच्या संबंधाने
१)महिला पोषण आणि आरोग्य
२)महिला आणि मानसिक आरोग्य
३)महिला सबलीकरण
४)महिला आणि कायदा
५)महिला आणि आर्थिक साक्षरता
६)महिलाविषयक प्रश्नांचे साहित्यातील प्रतिबिंब
७) महिला आणि उद्योग
या विषयावर तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
उदघाटन सत्रानंतर पहिल्या सत्रात परभणी येथील कृषी विद्यापीठातील डॉ. विना भालेराव या अध्यक्ष राहणार आहेत तर डॉ. शैलजा वाडीकर व डॉ.विजया साखरे या साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करतील .दुसऱ्या सत्रात डॉ. वैजयंता पाटील या अध्यक्ष असतील तर सिनेट सदस्य डॉ. शालीनी कदम व डॉ. वर्षा दोडीया या साधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहतील.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉ. रामेश्वर पवार तर प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा भोसले , सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. कुसुमताई मोरे या उपस्थित राहणार आहेत.
तरी या राष्ट्रीय चर्चासत्रात जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या राष्ट्रीय चर्चासत्राचे निमंत्रक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार व संयोजक तथा महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समिती समन्वयक डॉ. शारदा बंडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या