🌟फरकंडा येथील हनुमान चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषणास प्रारंभ🌟
🌟साखळी उपोषणास बसलेल्यांत फळा,फरकंडा,जवळा, आईनवाडी,डिग्रस आणि गुळखंड गावच्या ग्रामस्थांचा समावेश🌟
पालम : पालम तालुक्यातील फरकंडा येथील हनुमान चौक येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
या साखळी उपोषणात तालुक्यातील सहा गावच्या ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बुधवार दि.२५ ऑक्टोंबर २०२३ पासून फरकंडा येथील हनुमान चौक येथे साखळी उपोषणास सुरुवात केली. त्यात फळा, फरकंडा, जवळा, आईनवाडी, डिग्रस आणि गुळखंड गावचा समावेश आहे.
मराठा समाजास शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे. त्याचा विचार करून समाजास तातडीनं आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्याची निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने पालम तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यात सदर गावचे ग्रामस्थ साखळी पद्धतीने उपोषण करणार आहेत.....
:
0 टिप्पण्या