🌟भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांची शासकीय रुग्णालयात धाव🌟
नांदेड - नांदेड येथील विष्णुपुरीतल्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना उघडकीस आल्यानंतर भाजपाचे नांदेड महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात धाव घेतली.
यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ.शामराव वाकोडे यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांना घटनेची माहिती दिली.
कंदकुर्ते यांनी रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधला.अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचा कारभार, उपचार,औषधांचा तुटवडा,अपुरे उपचार यासह विविध तक्रारी केल्या.या तक्रारीची कंदकुर्ते यांनी गंभीर दखल घेऊन रुग्णांच्या सोयीसुविधेसाठी व उपाय योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निकाली काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी शितल खांडिल, दिलीपसिंघ सोडी, अमोल कदम यांची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या