🌟ना.धनंजय मुंडे यांचे डॉ. संतोष मुंडेंनी मानले विशेष आभार🌟
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नांतून निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडेंनी आभार मानत अजून जोमाने दिव्यांग कल्याण्यासाठी काम करत राहू असा निर्धार व्यक्त केला सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दिव्यांग, निराधार, विधवा आदी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी डॉ. संतोष मुंडे हे सातत्याने कार्यरत असतात. आपल्या निवडीबद्दल ना. धनंजय मुंडेंचे विशेष आभार डॉ. संतोष मुंडेंनी मानले.
*कोण आहेत डॉक्टर संतोष मुंडे ?
मुळचे नाथऱ्याचे असलेले डॉ. संतोष मुंडे हे पेशाने डॉक्टर आहेत. मुळातच समाजकार्याचे बाळकडू आणि सामाजिक सेवेचा वारसा असलेले डॉक्टर कायमच अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तसेच हिंगोली व परभणी जिल्ह्याचे प्रभारी आहेत. धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रात ते काम करत असतात. सोबतच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे संचालक.
गेल्या पंधरा वर्षापासुन डॉ.संतोष मुंडे यांनी डॉक्टर व्यवसायाच्या माध्यमातुन सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. मुळातच डॉ.संतोष मुंडे यांनी सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेऊन कार्य करणे हा त्यांचा छंद आहे. डॉक्टर झाल्यापासुन संतोष मुंडे यांनी अनेक रुग्णांना मोफत उपचार व औषधे दिली आहेत. जेष्ठ नागरीकांना मोफत तपासणी ही योजना त्यांच्या श्रीनाथ रुग्णालयातुन सुरु केली असुन ती अखंडित आहे. याच सामाजिक कार्यातुन डॉ.संतोष मुंडे यांनी अपंगांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून हजारो अपंगांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
देशातील लाखों अपंगांना त्यांच्या न्याय हक्कासाठी डॉ. संतोष मुंडे यांनी संसदेवरदेखील मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाची केंद्र सरकारने दखल घेतली असुन विविध २१ प्रकारच्या अपंगांना त्यांचे अपंगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात केंद्र सरकारला भाग पाडले विशेष म्हणजे या सर्व कार्याची दखल घेवुन ना. धनंजय मुंडे व ना.बच्चुभाऊ कडु यांनी डॉ.संतोष मुंडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी राज्य उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आहे तसेच ३८०० गरजूंना मोफत श्रवणयंत्र (कान मशिन), १६०० कुबड्या, तीन चाकी सायकल यासह विविध साहित्य अपंगांना वाटप केले असुन अनेकांचे किडनी, कॅन्सर, ब्रेन ट्युमर, मोतीबिंदू यासह विविध आजारावर मोफत उपचार करुन दिले आहेत.
परळी नगर परिषदसह जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत दिव्यांगांना एक कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिलेला आहे.हजारो दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यासोबतच तब्बल साडे चार हजार दिव्यांग, जेष्ठ नागरिक, विधवा आदींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या विविध योजनेचा ही अपंगांनाही लाभ मिळवुन दिला आहे. अपंगांसोबत शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या व करोना परिस्थितीमध्ये परळी डॉक्टर मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातुन वेळप्रसंगी मोफत उपचार दिले आहेत.
डॉ.संतोष मुंडे हे परळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते तेव्हा शासनाच्या विविध आरोग्य योजना जनतेला मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बालाजीच्या धर्तीवर वैद्यनाथ मंदिरात अपंगांसाठी दर्शन सुविधा उपलब्ध करुन दिली. फक्त अपंगांपुरतेच कार्य नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे कार्य सुरु असते.या सर्व कार्याची दखल घेऊन देश विदेशातील विविध संघटनांनी त्यांचा गौरव केला आहे. यात परळी भूषण, गोवा युथ आयकॉन, लंडनमध्ये युवा आयकॉन, लोकरत्न रोटरी भूषण आदी पुरस्कारांचा समावेश आहे....
0 टिप्पण्या