🌟जिंतूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त....!


🌟स्थानिक गुन्हें शाखेची धाडसी कारवाई : जिंतूर शहरातील धोबी गल्लीतील आरोपी ताब्यात🌟  

परभणी (दि.२७ ऑक्टोंबर) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकान गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्री धड टाकून शहरातील धोबी गल्लीतल्या अक्षय उर्फ पप्पु शिवानंद थिटे याच्याकडून अडीच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.

         पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अंमलदार विलास सातपुते, सिध्देश्‍वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, आशा शेल्हाळे, संजय घुगे, बालाजी रेड्डी व गणेश कौटकर यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान कळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीस ताब्यात घेवून गुटख्याचा साठा जप्त केला. तो माल त्याने मंठा (जि. जालना) येथील सलमान पठाण याच्याकडून विकत घेतल्याची माहिती मिळाल्या पाठोपाठ या पथकाने त्याही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या