🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंब्यासाठी कॅन्डल मार्च...!


🌟या कॅन्डल मार्चमध्ये युवक,युवती,महिला तसेच सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते🌟


पुर्णा (दि.२९ ऑक्टोंबर) : क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या आमरण उपोषण व आंदोलनास पाठींबा दर्शवण्यासाठी पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील सकल मराठा समाजाच्या वतीने काल शुक्रवार दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्री भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला.

          या कॅन्डल मार्चमध्ये युवक,युवती,महिला तसेच सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक मराठा,लाख मराठा या घोषणेने ताडकळसमधील बाजारपेठ अक्षरशः दुमदुमली. सरकारने आता समाजबांधवांचा संयम पाहू नये, आरक्षण जाहीर करावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या