🌟 परभणीत भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीचा रविवार दि.०८ ऑक्टोंबर रोजी मेळावा....!


🌟जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी या मेळाव्यास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे - जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे


परभणी (दि.०५ ऑक्टोंबर) : भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचा रविवार 8 ऑक्टोंबर रोजी कौस्तूभ मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यास माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांनी दिली.

             व्यापारी आघाडीतर्फे आयोजित केलेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र, नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार होणार आहे. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे डहाळे यांनी म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या