🌟हदगाव तालुक्यातल्या वडगावातील २४ वर्षीय शुभम पवार या युवकाने केली आरक्षणासाठी आत्महत्या🌟
नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील वडगाव येथील शुभम सदाशिव पवार या २४ वर्षीय इयत्ता १२ वी पास युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दि.२२ ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली.
येथील नरहरी मंगल कार्यालजवळ तामसा रोडचे बाजूला शुभम पवार मृत अवस्थेत मिळून आला त्याचे किशात विषारी ओषधी (monocrtofas) कंपनी ची बाटली व औषध खरेदी ची शिवशंकर कृषी सेवा केंद्र, अर्धापूर ची पावती आणि एक चिट्टी ज्या मध्ये मजकूर "एक मराठा लाख मराठा, माझ्या मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे, माझे हे बलिदान वाया जाऊ नये, मी शुभम सदाशिव पवार " असा मजकूर असलेली चिट्टी आहे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला असून सरकार मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार आहे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे....
0 टिप्पण्या