🌟त्या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार रांगोळीकार लुकेश फुलबांधे व कवयित्री-लेखिका संगीता ठलाल यांनी केले🌟
कुरखेडा : (दि.२४ ऑक्टो.२०२३) - नवरात्र उत्सवाच्या निमित्त्याने सीता माता शारदा मंडळ श्रीरामनगर कुरखेडा यांच्या वतीने नृत्य स्पर्धा, हांडी फोड स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मुलां, मुलींनी तसेच महिलांनी सुद्धा भाग घेतले होते. तेजस्विनी माकडे, अदिती चुन्ने, समर्थ तायडे, तेजस मार्कड, संघर्ष कुवंर, उमंग पाटणकर, वैष्णवी, माकडे, लिनय जेंगठे, नयन मडावी, देवधर कुंवर, सौ.जास्वंदा दरो, सौ.शालू पुडो यांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
त्या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार, रांगोळीकार लुकेश फुलबांधे व कवयित्री-लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी केले. स्पर्धकांना बक्षिस वितरण करताना विशेष अतिथी म्हणून जेष्ठ नागरिक राऊत सर, प्रमुख पाहुणे बालपांडे मॅडम, कवयित्री संगीता ठलाल व लुकेश फुलबांदे मान्यवर म्हणून उपस्थित होते. तसेच मंडळातील कार्यकर्ते व श्रीरामनगर येतील बहुसंख्य महिला व पुरूष उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तू तसेच बुक-पेन देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन सुनिता आदे यांनी केले तर आभार सीता माता शारदा मंडळ श्रीरामनगर यांनी मानले. अशी माहिती आम्हाला श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी उपलब्ध करून दिली आहे......
0 टिप्पण्या