🌟मानवत शहरातील तापडिया लॉज मधील घटना🌟
मानवत : तापडिया लॉजवर तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा जनांसह लॉज मॅनेजर वर मानवत पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ०४-३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
तापडिया लॉजच्या रूम नंबर ९ मध्ये तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. प्रत्यक्ष जागेवर गेले असता तिचे दहा जण जुगार खेळत असलेले आढळले. त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य, मोबाईल व नगदी असा ३८४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये कारवाई करून त्यांना नोटिसवर सोडण्यात आले. यात लॉजचे मॅनेजर चा सहभाग आहे. या कारवाईत सपोनी बनसोडे,ग्रेड पोउपनि पतंगे, पोहे.पंचांगे, पोहे. शेख, पोना. खूपसे, पोशी, बावरी यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या